Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 13 February 2015

जन्मांक 1: जन्मतारीख1,10,19,28

-महावीर सांगलीकर
 Cell No. 8149703595कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त्रात जन्मांक 1 हा सगळ्यात चांगला जन्मांक मानला गेला आहे. मोठमोठे नेते, लढाऊ राजे, सेनापती, वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन कांहीतरी करणारे यांच्यात 1 जन्मांक असणा-या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसते.

जन्मांक 1 असणा-या व्यक्ति उपजतपणे नेतृत्वगुण असणा-या आणि महत्वाकांक्षी असतात. त्यांचं मुख्य ध्येय आपापल्या क्षेत्रात एक नंबरला पोहोचणं हे असतं. या व्यक्ति अगदी गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये असल्या, तरी तिथं त्या कॅप्टन असण्याची जास्त शक्यता असते, किंवा त्यांचं ध्येय कॅप्टन होण्याचं असतं. नोकर असण्यापेक्षा बॉस असणं त्यांना जास्त भावतं. इतरांच्या हाताखाली काम करणं, दुय्यम स्थान स्वीकारणं त्यांना आवडत नाही. इतरांच्यावर सत्ता गाजवण्याची उपजत महत्वाकांक्षा त्यांच्यात असते. त्यांच्याकडं उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य असतं.

त्यांना पाहिजे असलेली गोष्ट या व्यक्ति मिळवतातच. त्यांचे रहाणीमान उच्च दर्जाचे असतं.

या व्यक्ति आपापल्या क्षेत्रात नव्या युगाची सुरवात करणाऱ्या असतात. त्या दिलदार, अनेकांच्या पोशिंद्या, सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या या असतात. कुणावर अन्याय झालेला त्यांना खपत नाही. अगदी त्यांच्या शत्रूवरही अन्याय होत असेल तरी त्यांना ते रुचत नाही.

जन्मांक 1 असणा-या व्यक्तिशी कुणी शत्रूत्व पत्करले, तर त्या शत्रूचा पाडाव होणार हे नक्की असते. पण विशेष म्हणजे शत्रूनं चांगली लढत दिल्यास त्याचं कौतुक करण्याचा दिलदारपणा देखील त्यांच्यात असतो. कुणी दगाबाजी केल्यास या व्यक्ति त्याचा निर्दयपणे बंदोबस्त करतात. त्यांचे शत्रू त्यांच्या विरोधात गुप्त कारवाया करण्याची शक्यता असते, पण जन्मांक 1 च्या व्यक्ती सहसा आपल्या शत्रूंना पुरून उरतात.

जन्मांक 1 असणाऱ्या व्यक्ति परफेक्ट हिरो अथवा परफेक्ट व्हिलन असतात.

हेच गुण भाग्यांक 1 असणा-या व्यक्तींमध्येही दिसून येतात.

या जन्मांकामध्ये कोणत्याही महिन्याच्या 19 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींमध्ये 1 या अंकाचे गुणदोष जास्त प्रमाणात आलेले दिसतात.

लकी नंबर्स 
1 व एक अंकी बेरीज 1 येणारे नंबर्स (उदा. 1234 = 1+2+3+4 = 10 = 1+0 = 1), म्हणून 1234 हा एक लकी नंबर).

फ्रेंडली नंबर्स 
1, 5, 7

अनफ्रेंडली नंबर्स
2, 4, 6

लकी कलर्स
सोनेरी, पिवळा, ब्राऊन

करीअर:
या जन्मांकाच्या व्यक्तींना योग्य असणाऱ्या करिअर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स

जन्माक किंवा भाग्यांक 1 असणा-या कांही व्यक्ति:

छत्रपती शिवाजी महाराज, लेनिन, मार्टिन ल्युथर किंग, जेम्स वॅट, माओ त्से तुंग, एनी बेझंट, लॉर्ड माउंट बॅटन, शिवाजी गणेशन, इंदिरा गांधी, किरो, बिल गेटस, बिल क्लिंटन, प्रिन्सेस डायना, मारिया शारापोव्हा,

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो).हेही वाचा:

4 comments:

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख