Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 21 February 2015

तुमच्या नावाचे पहिले अक्षर

-महावीर सांगलीकर
Mobile Phone 8149703595अंकशास्त्रात जन्मतारखेइतकेच नावालाही महत्व आहे. जन्मतारखेवरून जन्मांक आणि भाग्यांक काढला जातो, तर नावाच्या इंग्रजी स्पेलिंग वरून नामांक काढला जातो. नामांकाला जन्मांक आणि भाग्यांक यांच्याइतकेच महत्व आहे.

एखाद्या व्यक्तीच्या नावाचा आणि नामांकाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर बर-वाईट परिणाम होत असतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर काय आहे हे देखील फार महत्वाचे असते. जसे एखाद्या रेल्वेगाडीला इंजिन महत्वाचे असते, तसेच एखाद्याच्या नावाचे पहिले अक्षर महत्वाचे असते.

एखाद्या व्यक्तीच्या केवळ नामांकाचा विचार करण्याऐवजी नावाच्या आणि आडनावाच्या पहिल्या अक्षराचा विचार करणे महत्वाचे ठरते.

तुमच्या नावाचे पहिले अक्षर इंग्रजी मुळाक्षरात कितव्या नंबरला आहे त्यावरून त्या अक्षराची अंकातली किंमत ठरते. अंकशास्त्रात त्या नंबरचे जे गुणदोष असतात, तेच तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षराचे असतात. जसे, जर तुमचे नाव A या अक्षराने सुरू होत असेल तर तुमच्या  व्यक्तिमत्वात 1 या अंकाचे गुणदोष येतील, कारण A या अक्षराचा अंक 1 आहे.

इथे तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की केवळ पहिल्या अक्षरावर सर्व कांही अवलंबून नसते, तर जन्मांक, भाग्यांक, नामांक यांचा विचार केल्यावरच नावाच्या पहिल्या अक्षराचा विचार करावा लागतो. नावाच्या पहिल्या अक्षराची अंकातली किंमत जन्मांक, भाग्यांक अथवा नामांक यांच्यापैकी एखाद्या अंकाएवढी असेल तर ते अक्षर त्या घटकाचे गुणदोष वाढवायला पूरक ठरते. म्हणजे समजा तुमचे नाव नरेश आहे आणि तुमचा जन्मांक 5 आहे.... आता तुमच्या नावाचे पहिले अक्षर N आहे आणि त्याची अंकातली किंमत 5 आहे. अशावेळी N या पहिल्या अक्षरामुळे तुमच्या जन्मांक 5 चे गुणदोष वाढतील.

पुढे नावाची पहिली अक्षरे आणि त्यांचे अंक दिलेले आहेत:

अक्षरे         अंक         गुणदोष
A, J, S       1      पुढाकार घेण्याची वृत्ती, नेतृत्व क्षमता, संघटन कौशल्य, व्यवस्थापन, बॉसिंग
B, K, T     2      सौदर्य दृष्टी, कलेची आवड, मुत्सद्दीपणा, ज्ञानार्जन, चंचलता
C, L, U     3      उत्साह, मैत्रीभाव, मदत करण्याची वृत्ती, खर्चिक वृत्ती, भिन्नलिंगी आकर्षण
D, M, V    4      तर्कनिष्ठता, विश्लेषक आणि समीक्षक वृत्ती, स्पष्टवक्तेपणा, आर्थिक उदासीनता
E, N, W    5      बहुआयामी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व, मूडी स्वभाव, डिप्रेशन
F, O, X     6       कुटुंबवत्सलता, जबाबदार वागणे,  मदत करण्याची वृत्ती,  व्यवस्थापन,
G, P, Y     7      अंतर्मुखता, कार्यमग्नता,  विश्लेषक वृत्ती, स्वमग्नता, आध्यात्मिकता
H, Q, Z     8      व्यवस्थापन,  धन-संपत्ती, नातेसंबधातल्या  समस्या, कठोर वागणे
I, R           9      मानवतावादी, आध्यात्मिकता, लढाऊ वृत्ती, संघर्षातून उशीरा मिळणारे यश

नावाची सुरवात जर पुढील अक्षरांनी होत असेल तर त्यांच्यामध्ये पुढील अंकांचे विशेष गुण असतात.
K         11   अंक 2 चे गुणदोष + आध्यात्मिकता
M        13    अंक 4 चे गुणदोष +  गूढ शक्ती
V         22   अंक 4 चे गुणदोष +  प्रभावी
Z         26    अंक 8 चे गुणदोष + आध्यात्मिकता

हेही वाचा:
नावात काय आहे?
अंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन
तुमच्या बिझनेसचं नाव
अंक आणि करीअर
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख