-महावीर सांगलीकर
Mobile Phone 9145318228
अंकशास्त्राविषयी अनेकांच्या मनात अनेक शंका आहेत. काही लोकांच्या मनात कुशंकाही आहेत. मी अंकशास्त्राच्या नजरेतून छ. शिवाजी महाराज हा लेख लिहिल्यावर अशा अनेक शंका आणि कुशंका उपस्थित करण्यात आल्या. येथे आपण मुख्य 2 शंका-कुशंका पाहू.
शंका 1. एकाच दिवशी अनेकांचा जन्म होतो. त्या सगळ्यांची जन्म तारीखही एकच असते. मग अंकशास्त्राप्रमाणे सगळ्यांचे भविष्य एकच असायला पाहिजे.
उत्तर: पहिली गोष्ट म्हणजे अंकशात्राचा मुख्य उद्देश्य भविष्य सांगणे हा नसून त्या-त्या व्यक्तीच्या गुण आणि दोषांचे, स्वभावाचे वाचन करणे हा आहे. त्यामुळे 'मग अंकशास्त्राप्रमाणे सगळ्यांचे भविष्य एकच असायला पाहिजे' हा मुद्दाच चुकीचा ठरतो.
आता एकाच दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव सारखाच असतो का? या प्रश्नाचे उत्तर 'तो साधारण पणे सारखा असतो' असे आहे. हे अनेकांना पटणार नाही, पण जे लोक अंक शास्त्राची प्र्याक्टीस करतात, त्यांना या गोष्टीचा अनुभव येत असतो.
इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की एखाद्या माणसाचे वाचन करताना त्याची फक्त जन्मतारीखच लक्षात घेतली जात नाही, तर त्याचे नावही लक्षात घेतले जाते. नावाचाही एक अंक असतो, त्याला नामांक म्हणतात. प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीचे वाचन म्हणजे त्याची जन्मतारीख (जन्मांक), संपूर्ण जन्म तारीख (भाग्यांक) आणि नाव (नामांक) यांचे वाचन असते. दोन व्यक्तींची जन्मतारीख सारखी असेल तर त्यांचे गुण दोष मोठ्या प्रमाणात सारखे असतात. त्यांचे नाव वेगेवेगळे असले तरी जर नामांक एकच असेल तर तर दोन्ही व्यक्तींचे स्वभाव, गुण, दोष हे जवळपास सारखेच असतात. इतकेच नाही तर जन्मतारखा आणि नावे वेगवेगळी असली पण जन्मांक, भाग्यांक, नामांक सारखेच असतील तर त्या व्यक्तीही स्वभाव, गुण-दोषांच्या दृष्टीने सारख्याच असतात.
आता त्या दोन समान व्यक्तींचे गुण दोष, स्वभाव सारखे असले तरी ती व्यक्ति त्यांचा कसा उपयोग करून घेणार हे त्या-त्या व्यक्तीवर अवलंबून असते. अंकशास्त्र त्या व्यक्तीचे 'Potential' सांगते, भविष्य नव्हे. शिवाय प्रत्येकाचे भविष्य हे केवळ त्याच्या स्वत:च्या गुण-दोषांवर अवलंबून नसते तर त्यामागे इतरही अनेक घटक असतात, जसे तिचे पालक, पत्नी/पती यांचा स्वभाव, गुणदोष वगैरे.
शंका 2: अंकशास्त्र हे शास्त्र आहे का? ते सिद्ध झाले आहे का?
या प्रश्नाच्या उत्तरासाठी अंकशास्त्र आणि विज्ञान हे पान वाचावे.
No comments:
Post a Comment