Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 7 February 2015

नावात काय आहे? अंकशास्त्रानुसार नावाचे स्पेलिंग बदलून फायदा होतो काय?

-महावीर सांगलीकर
8149703595नावात काय आहे? असं शेक्सपियरनं म्हंटलं होतं. पण त्याचं हे म्हणणं विशिष्ट संदर्भात होतं. प्रत्यक्षात नावात बरंच कांही आहे आणि असतं.

कांही नावं ऐकायला गोड वाटतात, तर कांही नावं ऐकायला नकोशी वाटतात. नावावरून त्या व्यक्तिची बरीच माहिती उघड होवू शकते, जसं त्याचा भाषिक समूह, प्रांत, जात, सामाजिक दर्जा, आणि बऱ्याचदा धर्म देखील. नावारून जात शोधण्याचा प्रकार तर भारतात फारच मोठ्या प्रमाणावर चालतो.

नाव ही त्या-त्या व्यक्तिची पहिली आणि सगळ्यात महत्वाची ओळख आहे. प्रत्येकाच्या नावाचा विशिष्ट अर्थ असतो. त्या नावाला पार्श्वभूमीही असते. नाव हा त्या व्यक्तीचा ब्रॅंड असतो. नावाशिवाय एखादी व्यक्ति असू शकत नाही.  आपलं नाव आकर्षक, ऐकायला गोड वाटणारं असणं हे फार महत्वाचं असतं. तुमच्या नावातले स्वर आणि व्यंजनं, त्यांची संख्या आणि प्रमाण यावर तुमच्या नावाचा गोडवा अवलंबून असतो.

न्युमरालॉजीमध्ये नावाला जन्मतारखेसारखंच महत्व आहे. एखादं नाव आपल्याला प्रचंड यश मिळवून देवू शकतं,  तर एखादं नाव आपल्या कामात अडथळे निर्माण करू शकतं. आपण आपली जन्मतारीख बदलू शकत नाही, पण नाव बदलू शकतो, एखाद्या नावात दोष असेल तर न्युमरालॉजीस्ट ते नाव बदलण्याचा अथवा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करण्याचा सल्ला देतो.

न्युमरालॉजीमध्ये नावाच्या प्रत्येक अक्षराला महत्व आहे, कारण प्रत्येक अक्षर हे विशिष्ट गुण आणि दोष याचं द्योतक असतं . नावातील किंवा स्पेलिंगमधील बदल हा जन्मतारखेशी सुसंगत असावा लागतो. नावात किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये योग्य बदल केल्यास त्याचा संबधीत व्यक्तिला चांगलाच फायदा होऊ शकतो. पण तुम्ही जेंव्हा नाव बदलता, तेंव्हा आधीच्या नावाचं वलय कांही एका दिवसात नष्ट होत नसतं. नाव बदलल्यानंतरही आधीच्या नावापासून लगेच सुटका होत नाही. शिवाय नावं बदलणं हे कायदेशीर प्रक्रियेमुळं तितकंसं सोपं पण नसतं. त्यामुळं नंतर नाव बदलण्यापेक्षा मुळातच नाव ठेवतेवेळी ते योग्य असं ठेवणं आणि त्याचं स्पेलिंग ही योग्य असणं हे जास्त चांगलं असतं. मग ते व्यक्तिचं  असो, संस्थेचं असो कि उद्योगाचं असो.

नावाच्या स्पेलिंगमधला बदल नावाच्या अर्थाचा अनर्थ करणारा नसावा. तसेच स्पेलिंग-बदल हे व्याकरण दृष्ट्याही योग्य पाहिजे. नावात दोष असला तरी मी सहसा नाव किंवा स्पेलिंग बदलण्याचा सल्ला देत नाही. कारण ते न बदलताही तुम्हाला नावातला, जन्मतारखेताला दोष कमी करता येतो.हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख