Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 27 March 2015

अंकशास्त्र: 26चा आकडा आणि वैवाहिक जीवन

 -महावीर सांगलीकर 
8149703595

माझ्याकडे वैवाहिक समस्या असणारे अनेकजण अंकशास्त्रीय सल्ला घ्यायला येतात. माझ्या आजपर्यंतच्या  अनुभवावरून अनुभवावरून कांही ठराविक तारखांना जन्मलेल्या व्यक्तींना वैवाहिक समस्या असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते असे दिसून येते. अशा तारखांमध्ये 26 ही तारीख विशेष विचार करण्यासारखी आहे.

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 26 तारखेस झाला असेल त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रचंड धन आणि संपत्ती मिळण्याची शक्यता असते. पण दुसरीकडे त्यांना नातेसंबधात समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.  ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 26 असेल, किंवा ज्यांचा भाग्यांक  26 असेल, (म्हणजे ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेतील  अंकांची बेरीज 26 येत असेल), किंवा  ज्यांचा नामांक 26 असेल त्यांच्या बाबतीत पुढीलपैकी एखादी गोष्ट घडलेली दिसते:

1. त्यांच्यापैकी अनेकांचे लग्न वेळेवर होत नाही, उशीर लागतो.
2. त्यांच्यापैकी  कांही व्यक्ति लग्न करत नाहीत. लग्न न करण्याचे कारण लग्न होत नाही हे नसून लग्न करण्याची इच्छा नसणे हेच जास्त प्रमाणात दिसून येते. अशा व्यक्तींनी स्वत:ला समाजसेवेला अथवा धार्मिक कामाला वाहून घेतलेले दिसते.
3. त्यांच्यापैकी अनेक व्यक्ति लग्न करतात, पण त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी पटत नाही.
4. त्यातील कांही जोडप्यांचे घटस्फोट होतात.
5.  कांहीजण घटस्फोट न घेता वेगळे रहात असतात.
6.  जे एकत्र रहातात, त्यातील अनेकांचे संबंध सलोख्याचे नसतात.
7. जोडीदाराचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
8. ज्यांच्या चार्टमध्ये 26 बरोबरच 7, 9, किंवा 11 यापैकी एखादा अंक आलेला असतो, त्या व्यक्ती आध्यात्मिक प्रवृत्तीच्या असतात, त्यांना संसारात फारसा रस नसतो.

26 या अंकाशी संबधीत व्यक्तीच्या जीवनात वर दिलेल्या सगळ्याच गोष्टी घडतील असे नाही, पण त्यापैकी एखादी अथवा एकापेक्षा जास्त गोष्टी घडण्याची दाट शक्यता असते.

असे असले तरी 26 तारखेला जन्मलेल्या किंवा भाग्यांक/नामांक 26 असलेल्या कांही अपवादात्मक व्यक्तींचे सुखी संसार पहायला मिळतात. याचे कारण म्हणजे अशा व्यक्तींच्या चार्टमध्ये  26 च्या जोडीला 2 किंवा 6 हा अंक असणे आणि जोडीदाराची जन्मतारीख 26 शी सुसंगत असणे हे आहे. जोडीदाराचा जन्मांक आणि भाग्यांक या व्यक्तींच्या जन्मांक आणि  भाग्यांकाशी सुसंगत  असेल तर  त्या जोडप्याला  फारशा समस्या येत नाहीत.हेही वाचा:
26 चा आकडा आणि गांधीहत्त्या
13 नंबरचे रहस्य
शक्तिशाली मास्टर नंबर्स
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख