Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 8 March 2015

जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

महावीर सांगलीकर 
मोबाईल नंबर 8149703595



ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 3 असतो.  अंकशास्त्रात हा नंबर फार चांगला मानला गेला आहे. मोठमोठे नेते, सेनापती, हुकूमशहा, उद्योगपती, अभिनेते यांच्यात 3 हा जन्मांक मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.

हे लोक मैत्रीपूर्ण, बोलके, उत्साही असतात. इतरांना मदत करायला ते सदैव तयार असतात.

या  व्यक्ति अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रचंड इच्छा शक्ती असणा-या असतात. त्यांना दुय्यम भूमिका करणे आवडत नाही आणि ते सतत  आपल्या क्षेत्रात एक नंबरवर पोहोचण्यासाठी धडपड करत असतात, आणि त्यात ते यशस्वी होतातही. सर्वोच्च असण्यातली ताकत त्यांना माहीत असते आणि ती ताकत कशी वापरायाची हेही त्यांना चांगलेच कळते.

आपले विचार आणि मते स्पष्टपणे व्यक्त करण्याची हातोटी त्यांच्याकडे असते. त्यांच्या प्रगल्भ आणि स्पष्ट विचारांमुळे, ज्ञानामुळे आणि तर्कबुद्धीमुळे  लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. समाजात त्यांना मान मिळतो.

या व्यक्ति संयमी, सहनशील, धैर्यवान  आणि कष्टाळू असतात. त्यामुळे हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेणे त्यांना चांगलेच जमते. कदाचित एखादे काम सोडून द्यायची वेळ आली, तरी ते मोठ्या नाराजीनेच तसे करायला तयार होतात.

आपल्या सहका-यांनी आपल्या आज्ञा ऐकाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते, आणि ते सहकारी अशा आज्ञा ऐकतातही.

यांच्या प्रेमळ स्वभावामुळे भिन्नलिंगी व्यक्ती यांच्याकडे आकर्षित होतात. यातून यांची अफेअर्स होण्याची शक्यता असते.

लकी नंबर्स
3 व एक अंकी बेरीज 3 येणारे अंक

फ्रेंडली नंबर्स
3, 6, 9

अनफ्रेंडली नंबर्स 
4, 7, 8

लकी कलर्स 
जांभळा, परपल, निळा, गुलाबी

जन्मांक 3 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति:
जिजाबाई, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन, जोसेफ स्टालिन, सर विन्स्टन चर्चिल, डार्विन, हेनरी फोर्ड, होमी भाभा, विक्रम साराभाई, रजनीकांत, शरद पवार, टॉम क्रूज

हेही वाचा: 

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख