Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 3 March 2015

जन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31

 -महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator)
8149703595
You may like to read:

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो.

यांची मुख्य विशेषता म्हणजे या व्यक्ति इतरांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात, आणि त्या मांडत असलेले विचार इतरांच्यापेक्षा खूपच वेगळे असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या नाण्याच्या छाप्याबद्दल बोलत असाल तर  या व्यक्ति काट्याबद्दल बोलतील, आणि नाण्याला केवळ दोनच बाजू नसून तीन बाजू असतात हेही दाखवून देतील.  वरवर विचार करण्या ऐवजी हे लोक खोलवर विचार करत असल्याने इतरांना असे वाटते की ते मुद्दाम आपले म्हणणे खोडून काढत आहेत. त्यात या व्यक्तींचा स्वभाव कांहीसा आक्रमक, फटकळ, स्पष्टवक्तेपणाचा असल्याने बऱ्याचदा समोरच्याचे मन दुखावले जाते.

यांचा स्वभाव बंडखोर असतो आणि या व्यक्ती प्रसंगी अत्यंत कठोर बनू शकतात.

आपल्या कामाच्या बाबतीत या व्यक्ति ‘परफेक्शनिस्ट’ असतात. या व्यक्ति ज्या क्षेत्रात काम करतात, तेथे त्यांच्याकडून फार मोठे, अविश्वसनीय काम होवू शकते. या व्यक्ति या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येतात.

परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ यांच्या जीवनात, कामात दिसून येतो.

या व्यक्ति पैशाला फारसे महत्व देत नाहीत. पैसा ही गोष्ट त्यांच्यासाठी दुय्यम असते. तसेच या व्यक्ति ‘अतिहुशार’ या सदरात मोडत असले तरी झटपट पैसे मिळवण्याचे ते टाळतात, आणि पैसे कष्टाने, विशेषत: त्यांच्या बौद्धिक  कष्टाने मिळवत असतात. 

शैक्षणिक आणि टेक्निकल क्षेत्रात जन्मांक 4 असणाऱ्यांची संख्या जास्त दिसते.

या व्यक्तिंना भरपूर मित्र आणि भरपूर शत्रूही असतात. ज्यांचा जन्मांक 2, 4 किंवा 8  आहे त्यांचे आणि या व्यक्तिंचे चांगलेच मेतकूट जमते.  8 जन्मांक असणाऱ्या व्यक्तिंशी यांचे चांगले पटते आणि भांडणेही होतात.

यांच्या पैकी ज्यांची जन्मतारीख 13 आहे त्या व्यक्ती आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांना दुखावणाऱ्या, त्रासदायक ठरू शकतात, तर 22 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती मोठे लोकोपयोगी काम करून दाखवू शकतात.

लकी नंबर्स:
4 व एक अंकी बेरीज 4 येणारे अंक ( 13, 22, 31, 40 ..... 103  ... 202 वगैरे)

फ्रेंडली नंबर्स 
2, 4, 8

अनफ्रेंडली नंबर्स
1, 3, 5, 9

लकी कलर्स:
लाईट निळा, हिरवा, ग्रे

जन्मांक 4 असणाऱ्या प्रसिद्ध  प्रसिद्ध व्यक्ति
जॉर्ज वाशिंग्टन, महाराणा प्रताप, राजाराम मोहन रॉय, दादाभाई नौरोजी,मायकेल फॅराडे,सर ऑर्थर कॉनन डॉयल,सरदार वल्लभ भाई पटेल, कर्मवीर भाऊराव पाटील, बराक ओबामा.

वरील यादीवर नजर टाकली तर त्यांच्यात ‘खमके’ राजकारणी, बंडखोर समाज सुधारक आणि जिनिअस व्यक्ति झालेल्या दिसतात.

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो).

Read more at: Characteristics of Birth Number 4

हेही वाचा:

42 comments:

 1. वरील लेख वाचताना, माझ्या विषयी बऱ्याच गोष्टींमध्ये मला साधर्म्य आढळून आलं आहे. एकंदरीत माझ्या बाबतीत आजवर जे काही घडलं किंवा घडत आहे. ते अगदी तंतोतंत आहे. खूप सुरेख शास्त्र आणि अभ्यास..
  धन्यवाद..

  ReplyDelete
  Replies
  1. Ekdam barobar.4 no asnarya vyakti waghch kadhi swbhav badlun bhandan hoil santa yet nahi

   Delete
 2. अगदी तंतोतंत बरोबर आहे़

  ReplyDelete
 3. अगदी सगळे बरोबर आहे जसे माझ्या जिवनात आहे तसेच आहे हे सर्व

  ReplyDelete
 4. वरील लेख वाचताना, माझ्या विषयी बऱ्याच गोष्टींमध्ये मला साधर्म्य आढळून आलं आहे. एकंदरीत माझ्या बाबतीत आजवर जे काही घडलं किंवा घडत आहे. ते अगदी तंतोतंत आहे. खूप सुरेख शास्त्र आणि अभ्यास..
  धन्यवाद..

  ReplyDelete
 5. As I am going through the above matter. Most of the things are perfect related to me. But last some months i am work less. I am not getting any work
  What is the problem. Please write back on - philburger13@live.com. Please help me.

  ReplyDelete
 6. Too much deep but True as well ..........Thank you....••!!!

  ReplyDelete
 7. सर प्रथमत:ह तुमचे अभिनंदन... खुप छान सुरेख पध्दतीने तुम्ही अकंशास्त्रावरून माणूस आणि त्यांच्या स्वभाव, दृष्टीकोन कथीत केलाय... माझ्या बाबतीत 85% ते 95% साम्य दर्शक आहेत.... धन्यवाद

  ReplyDelete
 8. माझा स्वभाव व सवयीबद्दल मिळतेजुळते आहे धन्यवाद

  ReplyDelete
 9. मला बर्याच गोष्टी पटल्या.13सप्टेंबर माझी जन्मतारीख आहे.वर सांगितल्याप्रमाणेच माझास्वभाव आहे.

  ReplyDelete
 10. वरील लेख वाचताना माझ्या माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनाशी तंतोतंत साम्य आहे.खूप सुरेख अभ्यास व शास्त्र
  धन्यवाद.....

  ReplyDelete
 11. खुप चांगली माहिती मिळाली.धन्यवाद.

  ReplyDelete
 12. काही गोष्टी बरोबर आहेत असे वाटते

  ReplyDelete
 13. काही गोष्टी मला बरोबर आहेत अश्या वाटत्यात

  ReplyDelete
 14. Useful knowledge to common man

  ReplyDelete
 15. वरील लेख वाचताना, माझ्या विषयी बऱ्याच गोष्टींमध्ये मला साधर्म्य आढळून आलं आहे. एकंदरीत माझ्या बाबतीत आजवर जे काही घडलं किंवा घडत आहे. ते अगदी तंतोतंत आहे. खूप सुरेख शास्त्र आणि अभ्यास..
  धन्यवाद..

  ReplyDelete
 16. वरील लेख वाचताना, माझ्या विषयी बऱ्याच गोष्टींमध्ये मला साधर्म्य आढळून आलं आहे. एकंदरीत माझ्या बाबतीत आजवर जे काही घडलं किंवा घडत आहे. ते अगदी तंतोतंत आहे. खूप सुरेख शास्त्र आणि अभ्यास..
  धन्यवाद..(फक्त व्यवसाय का नोकरी हे पण हवं होत)

  ReplyDelete
 17. उत्कंठा वाढवणारा आपला अभ्यास , अभिनंदन !!

  ReplyDelete
 18. माझी जन्म तारीख 31 आहे त्यावरून तुम्ही जो लेख लिहिला आहे तो खरच माझ्या आयुष्याशी एकदम मिळता जुळता आहे खूप छान वाटलं वाचून

  ReplyDelete
 19. सुंदर यापैकी खूप गोष्टी तंतोतंत माझ्या वयक्तिक आयुष्यात घडत आहेत अथवा घडलेल्या आहेत..
  100 पैकी 95 टक्के साधम्र्य आहे
  धन्यवाद

  ReplyDelete
 20. लेख वाचला व माझामधील सारखे पना दिसून येतो

  ReplyDelete
 21. खूपच जुळून येतात

  ReplyDelete
 22. खरच खुप छान माहिती मिळाली.माझ्या जिवनाशी य़ा सर्व गोष्टी तंतोतंत मिळतात. धन्यवाद..

  ReplyDelete
 23. खुपच सुंदर आहे.मी अगदी अशीच आहे.

  ReplyDelete
 24. Kharokhar aapne jo likha hai so sab sahi hai,aap kaa ek ek shabda sahi hai.
  Dhanyavad.

  ReplyDelete
 25. D. S. Kote. Dear Sir Excellent& Thanks

  ReplyDelete
 26. कदाचित हे खर आहे..
  माझे अनुभव पण काहीसे असेच आहेत.
  माहितिबद्दल आभारी.

  ReplyDelete
 27. माझ जन्मतारीख 22 आहे. वरीलपैकी किमान 90% लेख माझ्या आयुष्याशी तंतोतंत जुळत आहे. अत्यंत विलक्षण अंकशास्त्र.

  ReplyDelete

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख