Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 31 March 2015

जन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25

-महावीर सांगलीकर
9145318228
9145318228

कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो.

जन्मांक 7 असणा-या व्यक्तिंचे वैशिष्ठ्य म्हणजे या व्यक्ति अंतर्मुख असतात. त्या वरून शांत दिसतात, पण मनातून अतिशय बेचैन असतात. या  व्यक्ति सतत कांहीतरी विचार करत असलेल्या दिसतात. त्यांना  एकांताची आवड असते, आणि अगदी कामाच्या ठिकाणीही एकांताचा अनुभव घेण्याचे कसब त्यांच्याकडे असते. आपले काम ही त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते.

या व्यक्तिंना आपल्या भावना व्यक्त करणे सहसा जमत नाही. इतरांशी संवाद साधण्यात या व्यक्ति
ब-याचदा कमी पडतात.

या व्यक्ति कोणताही निर्णय खोलवर विचार करून घेत असतात. त्यांच्याकडे इंट्यूशन पॉवर असते, त्यामुळे इतरांना सहसा लक्षात न येणा-या पुढील काळात होऊ शकणा-या गोष्टी यांच्या चटकन लक्षात येतात.

7 हा अंक उद्योग, व्यवसाय, विज्ञान आणि अध्यात्म यांच्याशी संबधीत आहे.  हा जन्मांक असणा-या व्यक्ति जास्त करून वरील क्षेत्रात आघाडीवर दिसतात.

जन्मांक 1, 5, 7 असलेल्या व्यक्तिंशी यांचे चांगले जुळते.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख