-महावीर सांगलीकर
9145318228, 9623725249
आपल्याला कांही लोक पहाताक्षणीच आवडतात तर कांही लोक आपल्याला अजिबात आवडत नाहीत, त्यांचा रागही येतो. असे का व्हावे बरे? याची अनेक कारणे आहेत.
जे लोक प्रसन्न, हस-या चेह-याचे असतात, अगदी अनोळखी लोकांनाही स्माईल देतात ते साहजिकच आपल्याला आवडतात. याउलट ज्यांचा चेहरा उदास किंवा खुनशी असतो, ज्यांच्या देहबोलीत अरेरावी झळकते ते आपल्याला आवडत नसतात.
ज्या लोकांचे चेहरे आपण आपल्या एखाद्या परीचीतासारखे असतात, ते अनोळखी चेहरे आपल्याला पहाता क्षणी आवडतात.असे चेहरे सुंदर किंवा आकर्षक असतीलच असे नव्हे.
या सहज सोप्या दोन कारणांशिवाय आणखी एक महत्वाचे कारण आहे, आणि ते अंकशास्त्रीय आहे.
एखादी व्यक्ति पहाताक्षणीच आपल्याला आवडली, तिच्याशी मैत्री करावी असे वाटले तर पक्के समजावे की त्या व्यक्तिचा जन्मांक किंवा भाग्यांक हा तुमच्या सारखाच आहे, किंवा किमान त्या व्यक्तीचे नंबर्स हे तुमचे मित्र नंबर्स आहेत. ही गोष्ट स्टॅटिस्टिकली सिद्ध करता येते.
अर्थात याला कांही अपवाद असतातच. त्यामुळे इतर जन्मांक किंवा भाग्यांक असणारे मित्रही असतात. पण त्यांचे प्रमाण फारच कमी असते.
हे केवळ मित्रांच्या बाबतीतच नसून तुम्हाला आवडणारे नेते, अभिनेते, तारका आणि इतर प्रसिद्ध व्यक्ति यांनाही लागू पडते.
Nice information.....
ReplyDelete