Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Thursday, 2 April 2015

जन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26

-महावीर सांगलीकर
914 531 8228
8149703595




8 हा अंक सत्ता, धन आणि संपत्ती यांच्याशी संबंधीत आहे. या अंकात प्रचंड शक्ती आहे. पण त्याचवेळी हा अंक विवाहविषयक आणि कौटुंबिक समस्या निर्माण करत असतो. माझ्याकडे विवाहविषयक किंवा कौटुंबिक समस्या  घेऊन येणा-या क्लाएंट्समध्ये सगळ्यात जास्त क्लाएंट्स हे जन्मांक 8 असणारे असतात. प्रॉबेब्लिटीच्या नियमाप्रमाणे  अशा समस्या घेऊन येणा-यांची संख्या 1/9 पाहिजे, पण प्रत्यक्षात त्यांची संख्या निम्म्याहून जादा असते.

हा जन्मांक असणा-या लोकांना येणा-या समस्या या बहुतेक वेळा त्यांनी स्वत: ओढावून घेतलेल्या असतात. सतत तणावाखाली रहाणे, छोटाश्या कारणाने नाराज होणे, झटपट निर्णय न घेणे, एकलकोंडेपणा, रॉयल रहाणी, ठामपणा, इतरांशी संवाद न साधणे, आपल्या भावना व्यक्त न करणे हे 8 हा जन्मांक असणा-यांचे कांही ठळक दोष.

यांचे लहानपण बहुधा खडतर गेलेले असते आणि यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट उशीरा घडत असते.

पण त्याचवेळी त्यांच्याकडे उशीरा का होईना प्रचंड धन आणि संपत्ती निर्माण करण्याची ताकत असते. त्यांना घरून फारसे कांही मिळत नाही आणि ते जे कांही करतात ते स्वत:च्या हिम्मतीवर करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात या व्यक्ति खूप यशस्वी झाल्याचे दिसते.

ज्या व्यक्तिंच्याबद्दल यांना आपुलकी असते, त्यांना या व्यक्ति बोलून दाखवत नाहीत, तर त्यांच्यासाठी कांहीतरी करून दाखवतात.

त्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता असते.

या व्यक्ति सावधचित्त असतात, समोरच्या व्यक्तीला जज करण्यात पटाईत असतात आणि समोरील व्यक्ति वाईट भावनेची असेल तर यांना ते लगेच कळते. हे गुण जन्मांक 8 असणा-या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात.

जन्मांक 4 असणा-यांशी यांची चांगली नाळ जुळते, तर जन्मांक 5 असणा-या बहुतेकांशी यांचे अजिबात पटत नाही.

8, 17, 26 या तारखेस जन्मलेल्या लोकांचे गुणदोष साधारणपणे वरील प्रमाणे असतात, आणि 8 पेक्षा 17 मध्ये आणि 17 पेक्षा 26 मध्ये हे गुणदोष जास्त प्रमाणात आलेले दिसतात.

जन्मांक 8 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति: गुरु नानक, मदर तेरेसा, मन मोहन सिंग, नरेंद्र मोदी, स्टीफन हॉकिंग, मनेका गांधी, एम. जी. रामचंद्रन, हैदर अली.



हेही वाचा:

3 comments:

  1. how do we follow the path of success if we fall on no 8

    ReplyDelete
  2. माझी जन्म तारीख १७.०४.१९६५ आहे,
    कृपया मला मार्गदर्शन कराल का ?
    सध्या खूपच त्रासात आहे मी.

    ReplyDelete
  3. My birth date is 08.04.1988,you will suggest me.i have a some problem.

    ReplyDelete

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख