Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 7 April 2015

जन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27

-महावीर सांगलीकर 
814 970 3595


कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो.

हा जन्मांक  1 ते 9 या जन्मांकामध्ये शेवटच्या ठिकाणी आहे. त्यामुळे 9 हा अंक  ‘नंबर ऑफ कम्प्लिशन’ मानला गेला आहे. आहे.

जन्मांक 9 असणा-या व्यक्तीमध्ये जन्मांक 1 चे अनेक गुण दिसून येतात. जन्मांक 1 सारखेच प्रचंड आत्मविश्वास, आक्रमकता, साहसीपणा, लढाऊपणा हे गुण जन्मांक 9 मध्ये दिसून येतात. पण जन्मांक 9 असणा-या व्यक्तिंना जन्मांक 1 असणा-या व्यक्तिंसारखे झटपट यश मिळत नाही तर उशीरा मिळत असते. त्यांचे जीवन संघर्ष आणि संकटे यांनी भरलेले असते.

जन्मांक 9 हा अपघाताशी संबंधीत अंक आहे आणि या व्यक्तिंच्या आयुष्यात सारखे अपघात होऊ शकतात. यांच्यात अहंकार आणि क्रोध या भावना इतरांपेक्षा जास्त प्रमाणात असतात. यांच्या चेहऱ्यावर राग दिसून येतो.

जन्मांक 9 साठी योग्य करीअर म्हणजे मोठे उद्योग, कन्स्ट्रक्शन, राजकारण, नेतृत्व, शिक्षण संस्था, NGO वगैरे. तसेच हे चांगले लढाऊ सैनिक होऊ शकतात.

यांची आणखी एक बाजू म्हणजे हे मानवतावादी आणि आध्यात्मिक असतात. विशेषत: यांच्या चार्टमध्ये 7, 8, 11 यापैकी एखादा अंक आला असेल तर हे जास्तच आध्यात्मिक असतात.

लकी नंबर्स:
9 व एक अंकी बेरीज 9 येणारे अंक (18, 27, 36)

फ्रेंडली नंबर्स:
3, 6, 9

अनफ्रेंडली नंबर्स:
4, 8

लकी कलर्स
लाल रंगाच्या सर्व छटा

करीअर:
या जन्मांकाच्या व्यक्तींना योग्य असणाऱ्या करिअर्स ची माहिती पुढील लिंकवर वाचावी:
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स

जन्मांक 9 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति: नेल्सन मंडेला, राम कृष्ण परमहंस, लिओ टॉलस्टॉय, विजया लक्ष्मी पंडीत, गॅलिलिओ, बरट्रांड रसेल, टॉम हॅन्क्स, ब्रॅड पिट


हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख