Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday, 22 April 2015

शक्तिशाली मास्टर नंबर्स 11, 22, 33

-महावीर सांगलीकर
8149703595


तुमची जन्मतारीख 11 किंवा 22  असेल, किंवा तुमच्या पूर्ण जन्मतारखेची दोन अंकी बेरीज 11, 22 किंवा 33 येत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात, कारण हे तीनही नंबर 1 ते 9 यापैकी  कोणत्याही  जन्मांक अथवा भाग्यांकापेक्षा जास्त शक्तिशाली आहेत. या नंबर्सना मास्टर नंबर्स या नावाने ओळखले जाते.

इतर अंकापेक्षा मास्टर नंबर्समध्ये जास्त शक्ति असते याचे कारण म्हणजे मास्टर नंबर्समध्ये दोन वेगवेगळ्या अंकांचे गुणधर्म आलेले असतात. जसे, 11 या अंकामध्ये एक या अंकाचे गुणधर्म तर असतातच, पण त्यात 1+1=2 या अंकाचे गुणधर्मही असतात. त्याचप्रमाणे 22 या  मास्टर नंबरमध्ये 2 आणि 4 या अंकाचे तर 33 मास्टर नंबर्समध्ये 3 आणि 6 या अंकाचे गुणधर्म असतात.

जन्मतारखेशिवाय तुमच्या नावातही मास्टर नंबर असू शकतो. (नामांक). नावानुसार येणारा मास्टर नंबर 11, 22, 33 हा किंवा मोठा म्हणजे 44, 55, 66, 77, 88, 99, 111 वगैरे असू शकतो.

ज्यांच्या चार्टमध्ये एखादा मास्टर नंबर आहे, ती व्यक्ति आपल्या क्षेत्रात खूप मोठे काम करू शकते. याचे एक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा भाग्यांक 22 होता तर त्यांच्या शिवाजी या नावाचा नामांक 33 होता. अशीच आणखी उदाहरणे म्हणजे उदयसिंह, राणा प्रताप, गुरु नानक, कर्मवीर भाऊराव पाटील, ओशो, अल्बर्ट आइनस्टाईन, थॉमस अल्वा एडिसन.

पण बरेच लोक त्यांच्याकडे एखादा मास्टर नंबर असला तरी त्याच्या गुणांचा उपयोग करून घेत नाहीत असे दिसून येते.

वेगवेगळ्या मास्टर नंबर्सच्या गुणदोषांची चर्चा पुढील भागात केली आहे.

हेही वाचा:
मास्टर नंबर 11
मास्टर नंबर 22 
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

1 comment:

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख