Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 10 May 2015

अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे

-महावीर सांगलीकर
मोबाईल नंबर्स:
9145318228 (Talks)
8149703595


कांही लोक अंकशास्त्राचा संबंध ज्योतिषशास्त्राशी जोडतात, पण ते चुकीचे आहे. कारण अंकशास्त्राचा संबंध ग्रहगोलांशी नसून अंकांशी आहे. पारंपारिक अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचा संबध एखाद्या ग्रहाशी जोडण्यात आला आहे, पण आधुनिक अंकशास्त्रात हा संबंध पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. कारण प्रत्येक व्यक्तिवर ग्रहगोलांचा नव्हे तर अंकांचा परिणाम होत असतो.

ज्योतिषशास्त्रात संबधीत व्यक्तिच्या जन्मवेळ आणि जन्मस्थानाची अचूक माहीत असावी लागते. अंकशास्त्रीय वाचनाला जन्मवेळेची आणि जन्मस्थानाची गरज नसते तर केवळ पूर्ण जन्मतारीख आणि व्यक्तीचे नाव या गोष्टीच महत्वाच्या असतात.

एखाद्या व्यक्तिची जन्मतारीख माहीत नसेल तर त्या व्यक्तिची कागदोपत्री नोंदलेली तारीख अंकशास्त्रीय वाचनाला तितकीच उपयोगी पडते. कारण अंकशास्त्रात अंकाला महत्व असल्याने नोंदल्या गेलेल्या तारखेला महत्व येते. पण ज्योतिषशास्त्रात असे चालत नाही.

ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारची गणिते करून जे निष्कर्ष निघतात, तेच किंवा त्यांच्यापेक्षा तपशीलवार निष्कर्ष अंकशास्त्रात केवळ अंकांचा अभ्यास करून निघतात.

भारतीय ज्योतिषशास्त्रात उपाय म्हणून ग्रहशांती, खडे, अंगठ्या, पूजाअर्चा असे उपाय सुचवले जातात. भारतात ज्योतिषी जर अंकशास्त्राची प्रॅक्टिस करत असेल तर तो अंकशास्त्रीय उपाय म्हणून असलेच उपाय सुचवत असतो. पण असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

खरे अंकशास्त्रीय उपाय हे संबधीत व्यक्तिमध्ये असलेल्या गुणांचा विकास, दोषांना आळा घालणे, स्वभावात बदल, नावात अथवा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल, कांही विशिष्ट अंकांचा आणि रंगांचा वापर करणे अथवा टाळणे हेच आहेत.

कोणत्याही शास्त्रात रोज नवीन नवीन संशोधन होत असते. अंकशास्त्राच्या बाबतीतही हे दिसून येते. गेल्या शंभर वर्षात अंकशास्त्रात खूपच नवे संशोधन झाले आहे आणि आजही होत आहे. त्यामुळे हे शास्त्र जास्तीत जास्त आज जास्तीत जास्त अचूक ठरत आहे. ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत असे म्हणता येत नाही.

ज्यांना अंकशास्त्राचा अभ्यास करायचा असेल त्यांनी तो करताना आपल्या मनातला ज्योतिष शास्त्र हा विषय बाजूला ठेवला पाहिजे. या दोन्ही शास्त्रांची गल्लत करता कामा नये.


हेही वाचा:
अंकशास्त्र म्हणजे काय?
अंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा
विज्ञान म्हणजे काय? गूढ विद्या आणि विज्ञान
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख