Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 31 May 2015

अंकशास्त्र: नरेंद्र मोदी

महावीर सांगलीकर
8149703595भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. त्यांचा जन्मांक 8 आहे तर भाग्यांक 5 आहे. त्यांचा नामांक त्यांच्या जन्मांका एवढाच म्हणजे 8 आहे.

जन्मांक: 17=1+7=8
भाग्यांक: 17.9.1950 = [ (1+7) + (9) + (1+9+5+0) = (8) + (9) + (15) = 32 = 3+2=5
नामांक:
NARENDRA     MODI
5 1 9 5 5 4 9 1     4 6 4 9
39                        23
12                  +    5  =17 =1+7=8

त्यांच्या व्यक्तिमत्वावर 8 आणि 5 या दोन्ही अंकांचा प्रचंड प्रभाव पडलेला दिसतो.

अंक 8: सत्ता, ठामपणा, हुकुमशाही वृत्ती, कौटुंबिक समस्या, खडतर जीवन, अडथळे
अंक 5: झटपट विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची शक्ति, संभाषण कला,

नरेंद्र मोदी यांच्यात या दोन्ही अंकांचे बरेच गुणदोष मोठ्या प्रमाणात आलेले दिसतात.

8 आणि 5 हे अंक परस्परविरोधी आहेत.  5 हा अंक मोदी यांचा भाग्यांक आहे. भाग्यांक हा बऱ्याचदा जन्मांकावर मात करतो. त्यामुळे 8 या अंकाचे उशीरा निर्णय घेणे, चालढकल करणे हे दुर्गुण मोदी यांच्यात दिसत नाही, कारण 5 या अंकाच्या गुणांनी त्यावर मात केलेली आहे. 8 या अंकामुळे जीवनात उशीरा यश मिळते, तर 5 हा अंक लवकर यश देतो.  इथंही भाग्यांक असणा-या 5 ने जन्मांक 8 वर मात केलेली दिसते, त्यामुळे बऱ्याच बाबतीत नरेंद्र मोदी यांना कमी वयात यश मिळालेलं दिसतं.


आता आपण नरेंद्र मोदी, त्यांच्या जीवनातील प्रमुख घटना आणि त्यांचा 8 आणि 5 या अंकांशी असलेला संबंध पाहू:
वयाच्या 8 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध, वर्ष 1958 (पूर्ण बेरीज 23=5)
जन्म ठिकाण: VADNAGAR. या नावाची अंकातली किंमत 5.
NARENDRA MODI या नावाची अंकातली किंमत: 8
MODI या आडनावाची अंकातली किंमत: 
पत्नीचं नाव: JASODABEN अंकातली किंमत: 8
त्यांच्या वडिलांचं नाव DAMODARDAS अंकातली किंमत: 8
वयाच्या 8 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबध
वयाच्या 17 व्या वर्षी घर सोडले. (17 जन्मतारीख, 17=8). ते साल होते 1967. या सालातील अंकांची बेरीज 23=2+3 =5
1970 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. 1970 मधील अंकांची बेरीज 17=1+7=8
1988: भा.ज.प. च्या गुजरात युनिटच्या संघटन सचिवपदी निवड.  1988 मधील अंकांची बेरीज 26=2+6=8
पंतप्रधानपद: 26.5.2014 26=8
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे भारताचे 14 वे पंतप्रधान आहेत. 14=1+4=5
त्यांचं सध्याचं कामकाजाचं आणि निवासाचं ठिकाण: NEW DELHI: या नावाची अंकातली किंमत 8.

नरेंद्र मोदी यांनी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हे त्यांनी रात्री 8 वाजता जाहीर केलं! पुन्हा 8!

Read in English at:
Numerology of Narendra Modi, the Prime Minister of India
हेही वाचा:
अंकशास्त्र: मोदींची माणसं
उर्जित पटेल यांची आत्मघातकी सही
अंकशास्त्र: इंदिरा गांधी
अंकशास्त्र: मार्क झुकेरबर्ग
अंकशास्त्र: नरेंद्र दाभोलकर आणि अब्राहम कोवूर
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख