Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 6 June 2015

13 नंबरचे रहस्य: 13 हा अंक वाईट आहे का?

महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
814 970 3595


13 हा अंक युरोप आणि अमेरिकेत अशुभ मानला गेला आहे. इतका की तिथे अनेक ठिकाणी घराला 13 नंबर द्यायचे टाळले जाते, अनेक हॉटेलमध्ये 13 नंबरची रूम नसते. चीनमध्येही प्राचीन काळापासून हा अंक अशुभ मानला गेला आहे. भारतात हा अंक अशुभ मानला गेला नसला तरी तो शुभ अंकांच्या यादीतही नाही.

13 तारखेला घडलेल्या अनेक दुर्घटना किंवा 13 या नंबरशी संबधीत घडलेल्या दुर्घटना यामुळे या अंकाच्या अशुभतेमध्ये भरच पडली.

अमेरिकेने चंद्रावर जाण्यासाठी अपोलो ही मोहीम आखली. त्यातले अपोलो 11 हे यान चंद्रावर उतरणारे पहिले यान होते. त्यानंतर कांही महिन्यात अपोलो 12 हे यानही चंद्रावर यशस्वीपणे उतरले. पण नेमके अपोलो 13 या यानाच्या ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागली आणि हे यान अपयशी ठरले. विशेष म्हणजे हे यान नुसतेच अपोलो 13 नव्हते, तर ते दुपारी 13 वाजून 13 मिनिटांनी सोडण्यात आले होते. या घटनेमुळे अमेरिकेत आणि इतर ठिकाणी 13 या अंकाला आणखीनच अशुभ मानण्यात येऊ लागले.

भारतीय संसदेवर झालेला हल्ला ही भारताच्या इतिहासातील अत्यंत वाईट आणि अपमानकारक गोष्ट होती. हा हल्ला 13 तारखेस झाला होता. ब्रिटीश काळात जालियानवाला बाग इथे झालेलं भयानक हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी झालं होतं.

13 या अंकात चार या अंकाचे सर्व गुणदोष असतात, शिवाय चार या अंकापेक्षा वेगळेपण म्हणजे 13 या अंकात अनेक गूढ शक्ती असतात.  ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 13 तारखेस झाला आहे, किंवा ज्यांच्या  पूर्ण जन्मतारखेची बेरीज 13 येते अशा व्यक्तिंकडे कांही विशेष शक्ती असू शकतात. यात पुढे होणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळणे, मनाने दूर अंतरावर संदेश पाठवणे किंवा मिळवणे, मोहिनी घालणे अशा गोष्टींचा समावेश होतो. त्यांना हिप्नोटिझम, रेकी, जादू, स्पिरिच्युअल हीलिंग, टेलेपथी, माइंड रीडिंग या व त्यासारख्या विषयांमध्ये मास्टरी मिळू शकते. या व्यक्ति हुशार असतात आणि त्यांच्याकडे विलक्षण तर्कबुद्धी असते. पण त्यांच्या भावना तर्कबुद्धीवर मात करू शकतात. 

एखाद्याची जन्मतारीख 13 आहे, किंवा पूर्ण जन्मतारखेची बेरीज 13 आहे आणि त्या व्यक्तीच्या चार्टमध्ये    8, 9  हे अंक आले असतील (म्हणजे उदा. जन्मतारीख 13 आहे आणि भाग्यांक किंवा नामांक 8 अथवा 9 आहे) तर त्या व्यक्तीला वागणुकीच्या समस्या निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. मी अशा अनेक व्यक्ती पाहिल्या आहेत. 

अंकशास्त्रात 13 हा अंक चार 'कार्मिक डेब्ट्स' अंकांपैकी एक अंक आहे. एखाद्या व्यक्तीच्या चार्टमध्ये  कार्मिक डेब्ट्स अंक असेल तर त्या व्यक्तीला पूर्वायुष्यात अथवा पूर्व जन्मात केलेल्या चुकांचे फळ भोगावे लागते. (कार्मिक डेब्ट्स अंकांबद्दल मी  वेगळा लेख लिहित आहे). 13 अंक संबधित व्यक्तीला इतरांसाठी (विशेषतः कुटुंबीय, जोडीदार यांच्यासाठी) त्रासदायक बनवू शकतो.

चार्टमध्ये 13 हा अंक असेल तर घाबरून जायचं कारण नाही. या अंकाचे चांगले गुण तुम्ही स्वत:च्या आणि समाजाच्या भल्यासाठी वापरायला पाहिजेत, आणि वाईट गुणांपासून दूर राहिले पाहिजे..

हेही वाचा:
नंबर 26: आपत्तीचा नंबर
शक्तिशाली मास्टर नंबर्स 
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख