Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday, 24 June 2015

तुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व

-महावीर सांगलीकर 
मोबाईल फोन: 814 970 3595आपली सही हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. आपल्या मनोवृत्तीनुसार आपली सही बनत असते. प्रत्येकाची मनोवृत्ती वेगवेगळी असते, म्हणून सहीदेखील वेगवेगळी असते. दोन व्यक्तिंच्या  सह्या एकसारख्या नसतात, आणि अगदी कॉपी केली तरी हुबेहूब सही करणे ही फार अवघड गोष्ट असते. त्यामुळे आज जगभर सही ही प्रत्येक व्यक्तिची ओळख झाली आहे. (Identity Proof).

एखाद्याच्या सहीवरून त्या व्यक्तिविषयी, त्या व्यक्तिच्या मनोवृत्तीविषयी बरेच कांही सांगता येते. एखाद्याची सही गिचमिड असेल तर त्या व्यक्तिचा स्वभावही क्लिष्ट, लपवा-छपवी करणारा असणार आणि ज्याची सही स्पष्ट, बऱ्यापैकी वाचता येणारी असेल तर ती व्यक्ति पारदर्शक स्वभावाची असणार यात शंका नाही.


लता मंगेशकर यांच्या या सहीमध्ये त्यांच्या नावाचे पहिले अक्षर L आणि आडनावाचे पहिले अक्षर M खूपच मोठे आहे. त्याच प्रमाणे या दोन्ही अक्षरात वळणदारपणापेक्षा टोकदारपणा जास्त दिसतो. या गोष्टी त्यांचा स्वाभिमान, आग्रह, इगो, स्वमग्नता, स्पष्टवक्तेपणा  वगैरे दाखवतात. त्यांच्या सहीमधल्या g या अक्षराने खालच्या बाजू एक गाठ तयार केली आहे. ही गाठ म्हणजे त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या धन आणि संपत्तीचे लक्षण आहे.
सहीमध्ये खाडाखोड, फुल्या (क्रॉस), त्रिकोण, वर्तुळे असतील तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्या व्यक्तिची सही खाडाखोड केल्यासारखी असते, ती स्वत:च स्वत:चे नुकसान करून घेणारी असते. अशा व्यक्तिची मजल आत्महत्या करण्यापर्यंत जाऊ शकते.
 हिटलरच्या वरील सहीमध्ये त्याचा डाऊन फॉल दिसून येतो. त्याची उतरती सही  त्याचा शेवटही दाखवते.

तुमच्या सहीमध्ये दोष असतील आणि तुम्ही ते काढून टाकले, सही योग्य प्रकारे केली तर तुमच्या मनोवृत्तीतही नक्कीच बदल होतो. योग्य सहीमुळे तुमच्या प्रगतीला हातभार लागतो.

आपल्या इथे सहीमध्ये बदल करायचा सल्ला देणारे अनेकजण बऱ्याचदा चुकीचा सल्ला देतात. म्हणजे सही वरती चढत जाणारी, तिरपी असावी, तिच्याखाली आडवी रेघ ओढावी  आणि त्या रेघेखाली दोन टिंबे द्यावीत वगैरे. अशा सल्ल्यामुळे अलीकडे या प्रकारच्या सह्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. खरं म्हणजे अशा प्रकारे सह्या करणं सगळ्यांना फायदेशीर ठरत नाही. जसं, एखादी व्यक्ति हेकेखोर, ठाम मनोवृत्तीची असेल आणि ती व्यक्ति आपल्या सहीखाली आडवी रेघ ओढत असेल, टिंबे देत असेल तर त्या व्यक्तिला त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होण्याचीच जास्त शक्यता असते. याउलट एखादी व्यक्ति चंचल स्वभावाची असेल आणि तिने या प्रकारची सही केली तर त्याचा तिला नक्कीच फायदा होईल. तिरपी, वर चढत जाणारी सही सरसकट सगळ्यांना चांगली ठरू शकत नाही.

तुमची सही वळणदार, आकर्षक, स्पष्ट असावी. सहीमध्ये गिचमिडपणा टाळावा. सहीचे कोणतेही अक्षर प्रमाणापेक्षा जास्त खाली घसरणारी किंवा मागे वळणारी नसावी.  

तुमच्या सहीमध्ये दोष असतील तर जाणकार व्यक्तिचा सल्ला घेऊन सहीमध्ये योग्य बदल करायला पाहिजे.

सहीचा आणि तुमच्या जन्मतारखेचा जवळचा संबंध आहे. मी देत असलेल्या अंकशास्त्राच्या रिपोर्टमध्ये तुमची सही योग्य आहे की नाही, आणि योग्य नसल्यास त्या सहीत कोणते बदल करायला पाहिजेत हेही सांगितले जाते.

तुम्ही खूप कष्ट करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर नक्कीच तुमच्या सहीमध्ये मोठे दोष असणार. चुकीच्या पद्धतीने केलेली सही ही तुमच्या यशात मोठा अडथळा ठरू शकते. 

हेही वाचा:

2 comments:

  1. Maze naw arpita surve aahe mazi sahi kasi yeil marathit mala mazi sahi change karaychi aahe

    ReplyDelete

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख