Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Thursday, 27 August 2015

तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स

-महावीर सांगलीकर 
814 970 3595



तुम्ही जॉब करावा की व्यवसाय? जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा? स्वत:चा व्यवसाय करायचा असल्यास कोणता व्यवसाय करावा? या संदर्भात अंकशास्त्रानुसार योग्य मार्गदर्शन करता येते.

तुमच्या जन्मांक आणि भाग्यांकाला अनुकूल असे अनेक जॉब्स आणि व्यवसाय असतात. तुम्ही तुमचे करीअर त्यानुसार निवडले तर तुम्हाला त्यात जास्त यश मिळू शकते. याउलट तुमच्या जन्मांकाला किंवा भाग्यांकाला अनुकूल नसणारे करीअर करायला तुम्ही गेलात तर त्यात पाहिजे तुम्हाला तेवढे यश मिळणार नाही. 

इथे मी अंक आणि त्यांच्याशी संबधीत करीअरची थोडक्यात माहिती दिली आहे. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधावा, कारण अचूक करीअर सांगण्यासाठी त्या त्या व्यक्तिचा जन्मांक आणि भाग्यांक कॉम्बिनेशनचा आणि इतर अनेक गोष्टींचा सूक्ष्म विचार करावा लागतो, तसेच इतरही कांही अंक लक्षात घ्यावे लागतात.

तुमचा जन्मांक किंवा भाग्यांक हा तुमच्या जन्मतारखेनुसार ठरतो. तो कसा काढावा याची माहिती तुम्हाला  या लेखाच्या तळाला दिलेल्या लिंकवर मिळेल.

अंक आणि करीअर 

जन्मांक किंवा भाग्यांक 1:
1 हा अंक नेतृत्वाशी संबधित आहे. त्यामुळे ज्या व्यवसायात किंवा जॉबमध्ये नेतृत्वगुणाची गरज असते, असे करीअर जन्मांक किंवा भाग्यांक 1 असणाऱ्याना चांगले असते. हे लोक ऑर्डर घेण्यासाठी नव्हे तर ऑर्डर देण्यासाठी, इतरांच्याकडून कामे करवून घेण्यासाठी जन्माला आलेले असतात. बॉस किंवा मालक बनणे हेच यांना जास्त अनुकूल असते. राजकीय नेतृत्व, टीम लीडरशीप, व्यवस्थापन, मोठे उद्योग यात करीअर करणे यांना जास्त चांगले.  वहातूक, प्रवास यांच्याशी संबंधीत व्यवसायात यांना चांगले यश मिळू शकते. पोलीस किंवा सैन्य अधिकारी म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून हे यशस्वी होऊ शकतात. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन व्यवसाय यात यांना यश मिळते. हे लोक चांगले इंजिनिअर बनू शकतात. खेळाडू आणि सांघिक खेळांचे कप्तान बनू शकतात.

जन्मांक किंवा भाग्यांक 2:
हा अंक कला, संभाषण चातुर्य, मध्यस्थी यांच्याशी संबधीत आहे. सल्लागार, विक्रेते, चित्रकार, डिझायनर, मध्यस्थ, शिक्षक, ट्रेनर, मार्केटिंग या प्रकारचे करीअर यांना यश देते.  हे लोक चांगले आणि यशस्वी डॉक्टर्स बनू शकतात. तसेच चांगले सहाय्यक, सचिव, सेक्रेटरी बनू शकतात. 

जन्मांक किंवा भाग्यांक 3:
3 हा अंक व्यक्त होण्याशी संबधीत आहे. अभिनय, मनोरंजन, परफॉर्मिंग आर्ट्स, लेखन, कला, पब्लिक रिलेशन्स या प्रकारचे करीअर यांना जास्त चांगले. हे लोक इतरांना चांगल्या प्रकारे मोटीव्हेट करू शकतात, त्यामुळे मोटीव्हेटर, लाईफ कोच असे करीअर यांना चांगले यश देऊ शकते. हे लोक चांगले आणि यशस्वी डॉक्टर्स बनू शकतात, तसेच सेनाधिकारीही बनू शकतात..

जन्मांक किंवा भाग्यांक 4:
हा अंक तर्कनिष्ठ विचार, गणित, टेक्नॉलॉजी यांच्याशी संबधीत आहे. त्यामुळे पत्रकारिता, संशोधन, संपादन, गणिताशी संबधीत व्यवसाय, इंजिनिरिंग, आर्किटेक्चर असे करीअर यांच्यासाठी चांगले ठरते. संशोधक, डिटेक्टिव्ह, तपास अधिकारी, वकील म्हणून हे चांगले काम करू शकतात. शिक्षकी पेशा यांच्यासाठी चांगला ठरतो. शिवाय हे चांगले मेकॅनिक्स बनू शकतात.

जन्मांक किंवा भाग्यांक 5:
हा अंक मल्टिटॅलेंटेड लोकांचा अंक आहे. प्रचंड बुद्धिमत्ता, झटपट विचार करण्याची क्षमता आणि भाषेवरील कमांड ही यांची वैशिष्ठ्ये आहेत. शिवाय हे लोक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतात. त्यामुळे अभिनय, पब्लिक स्पीकिंग, संशोधन, कला, संगीत, निर्मिती, उद्योग-व्यवसाय, लिखाण, पत्रकारिता असे अनेक करिअर्स यांना चांगले यश देतात. संशोधक, डिटेक्टिव्ह, तपास अधिकारी म्हणून हे चांगले काम करू शकतात. वहातूक, प्रवास यांच्याशी संबंधीत व्यवसायात यांना चांगले यश मिळू शकते. 

जन्मांक किंवा भाग्यांक 6:
6 हा अंक जबाबदार आणि कुटुंबवत्सल लोकांचा अंक आहे. यांना डिझायनिंगशी संबंधीत करीअर (फॅशन डिझायनिंग, आर्किटेक्चर इत्यादि) आणि जबाबदारीच्या पदावरील नोकरी करणे चांगले असते. हे लोक मॅन्युफॅक्चरिंगमध्येही चांगले यशस्वी होऊ शकतात.

जन्मांक किंवा भाग्यांक 7:
7 हा अंक बिझनेस, इंडस्ट्री आणि धर्म-अध्यात्म यांच्याशी संबधीत, हा अंतर्मुख लोकांचा अंक आहे. हा जन्मांक किंवा भाग्यांक असणारे लोक उद्योग-व्यवसायात, सल्लागार म्हणून तसेच लोकांना बरे करणाऱ्या व्यवसायात (हीलिंग, मेडिकल) चांगले काम करू शकतात. चांगले ट्रेनर, शिक्षक, लेखकही बनू शकतात.

जन्मांक किंवा भाग्यांक 8:
8 हा अंक मनी नंबर आहे. यांना गणित आणि टेक्नॉलॉजीशी संबधीत व्यवसाय, इंजिनिरिंग, वकिली, शिक्षणक्षेत्र, व्यवस्थापन, फंड मॅनेजमेंट यात विशेष यश मिळते.  जबाबदारीच्या आणि सत्तेच्या पदावरील नोकरी चांगल्या प्रकारे करू शकतात. राजकारणात चांगले यश मिळू शकते.

जन्मांक किंवा भाग्यांक 9:
9 हा जन्मांक किंवा भाग्यांक असणाऱ्या व्यक्तिंना मोठे उद्योग, रिअल इस्टेट, राजकारण यात जास्त यश मिळते. पोलीस किंवा सैन्य अधिकारी म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून हे यशस्वी होऊ शकतात. 

जन्मांक किंवा भाग्यांक 11: 
यांना जन्मांक/भाग्यांक 2 चे सगळे करिअर्स यश देऊन जातात, शिवाय हे महान तत्वज्ञानी, आध्यात्मिक गुरु, स्पिरिच्युअल हिलर्स बनू शकतात.

जन्मांक किंवा भाग्यांक 13: 
यांना जन्मांक/भाग्यांक 4 चे सर्व करिअर्स चांगली ठरतात. शिवाय गूढ विद्या, हिप्नॉटिझम, रेकी, स्पिरिच्युअल हिलिंग, मॅजिक या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते.

जन्मांक किंवा भाग्यांक 22: 
यांना जन्मांक/भाग्यांक 4 चे सर्व करिअर्स चांगली आहेत. शिवाय शिक्षणक्षेत्र, NGO, कन्स्ट्रक्शन, राजकारण यात त्यांना मोठे यश मिळू शकते. 

जन्मांक किंवा भाग्यांक 26: 
यांना जन्मांक/भाग्यांक 8 आणि 13 ची सर्व करिअर्स चांगली असतात, शिवाय हे लोक महान मानवतावादी कामे यशस्वी रित्या करू शकतात. 




हेही वाचा:


No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख