Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 19 October 2015

अनिसचे विद्वान(?) लेखक/ कार्यकर्ते आणि अंकशास्त्र

-महावीर सांगलीकर 
8149703595 


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विद्वान लेखक त्यांना ज्या गोष्टी पटत नाहीत त्यांचे खंडन अनिस वार्तापत्र आणि इतर नियतकालीकांतून, भाषणातून, मेडीयातून करत असतात. तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण ते ज्या प्रकारे खंडन करतात ते बहुतेकवेळा तर्कहीन आणि हास्यास्पद असते.

इथे मी अनिसचे विद्वान लेखक अंकशास्त्राच्या विरोधात लिहिताना जे हास्यास्पद मुद्दे मांडतात त्याची काही उदाहरणे देत आहे.

मुद्दा: सचिन तेंडूलकर याची जन्मतारीख  24  आहे. 24 तारखेला अनेक लोकांचा जन्म झाला आहे. मग ते सगळेच सचिन तेंडुलकर का झाले नाहीत?
उत्तर: हा मुद्दा मांडणाऱ्या लेखकाचे अंकशास्त्राविषयीचे ज्ञान अतिशय तोकडे आहे हे दिसून येते. लेखकाने फक्त महिन्याची तारीख म्हणजेच अंकशास्त्र असा समज करून घेतला आहे. प्रत्यक्षात अंकशास्त्रात महिन्याची तारीख, पूर्ण तारखेची बेरीज, (तारीख+महिना+वर्ष), महिना, साल, या सर्व अंकांमध्ये कोणत्या अंकाचे जास्त रिपिटेशन झालेले आहे, नावचे स्पेलिंग, त्यानुसार निघणारा अंक (नामांक), सोल अर्ज नंबर, पर्सनॅॅलिटी नंबर, नावाचे पहिले अक्षर, नावात कोणत्या अंकाचे (अक्षराचे) रिपिटेशन झालेले आहे अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो.

मुद्दा: अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्रासारखेच आहे. मग त्याला ज्योतिषशास्त्र का म्हणत नाहीत?
उत्तर: अनिस लेखकाचा हा मुद्दाही त्याच्या अज्ञानातूनच आला आहे. अंकशास्त्र हा शब्द Numerology या इंग्रजी शब्दाचे भाषांतर आहे. Numerology या शब्दाला मराठीत, हिंदीत अंकशास्त्र हाच शब्द योग्य आहे. कांही लोक अंकशास्त्राला अंकज्योतिष असा शब्द वापरतात, पण ते पूर्ण चुकीचे आहे, कारण ज्योतिचा अर्थ ग्रह असा आहे आणि अंकशास्त्राचा संबंध ग्रहांशी नव्हे तर अंकांशी आहे. (बहुतांश अनिसवाले  महाभाग तर अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र एकच आहे अशा 'अंधश्रद्धेत' असतात! एवढ्यावरूनच त्यांचा बुद्ध्यांक कळतो!).

मुद्दा: शून्य हा सगळ्यात महत्वाचा अंक आहे, पण अंकशास्त्रात शून्याला स्थान नाही
उत्तर: जर शून्य ही तारीख अस्तित्वात असती, शून्य तारखेला जन्मलेले लोक अस्तित्वात असते, तर अंकशास्त्राने शून्याचा विचार केला असता. पण शून्य तारीख अस्तित्वात नाही, मग अंकशास्त्रात शून्य या अंकाचा विचार होईलच कसा? (कॉमन सेन्स). तसेच A ते Z या अक्षरांच्या अंकातील किमतींमध्येही एकाही अक्षराची किंमत शून्य नाही.

अडाणी लोकांसाठी ‘सब घोडे बारा टक्के’ आणि ‘काला अक्षर भैंस बराबर’ असते. अनिसच्या विद्वान (?) लेखकांची तीच गत झालेली दिसते.  ज्या विषयाचे खंडन करायचे असते, त्या विषयाचा बेसिक अभ्यास करणे गरजेचे असते. पण तो न करता अनिसचे विद्वान लेखक ऐकीव आणि गृहीत गोष्टींच्या आधारे खंडन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते करत असलेले खंडन बालीश आणि हास्यास्पद ठरते. स्वत:ला विज्ञानवादी म्हणवून घ्यायच्या आधी या लेखकांनी खंडणाची शास्त्रीय पद्धत काय आहे याचा नीट अभ्यास केला पाहिजे.

बऱ्याचदा अनिसवाले ज्योतिषांना वगैरे चॅलेंज देतात. पण अनेकदा अनिसवाल्यांची फजिती होत असते. मलाही त्यांची मोठी फजिती करायची इच्छा आहे. या लेखाद्वारे मी अनिसवाल्यांना चॅलेंज देत आहे. त्यांना मी विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयातले कांही प्रश्न विचारीन आणि त्यांनी त्यांची उत्तरे द्यावीत. त्यांनी जर ना टाळता योग्य उत्तरे दिलीत तर त्यांना योग्य आणि मोठे बक्षीसही देईन!


हेही वाचा:
विज्ञान म्हणजे काय?
डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि अब्राहम कोवूर

1 comment:

  1. अन्धश्रधा निर्मुलन वाल्यांचे विचार हे एकांगी पूर्वग्रह दुषित असतात . खरा विज्ञान वादी हा पूर्वग्रह दुषित नसून खुल्या व मोकळ्या मनाचा असतो .

    ReplyDelete

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख