Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 25 December 2015

अंकशास्त्र: मित्र अंक, शत्रू अंक

-महावीर सांगलीकर
8149703597


तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांच्या जन्मतारखा पाहिल्यास तुम्हाला असे दिसून येईल की त्यांच्यातील बहुतेकजनांचे जन्मांक तुमच्या जन्मांकाएवढेच आहेत किंवा ते तुमच्या जन्मांकाचे मित्र अंक आहेत. तसेच तुम्हाला हेही दिसून येईल की तुमचे ज्यांच्याशी पटत नाही त्यांचे जन्मांक कांही विशिष्ट आणि वेगळे अंकच आहेत.

या गोष्टीचा उपयोग तुम्हाला व्यावसायिक भागीदार निवडण्यासाठी, तसेच जीवनसाथी निवडण्यासाठी होऊ शकतो. इथं ही गोष्टही लक्षात घ्यायला पाहिजे की त्या व्यक्तिचा आणि तुमचा भाग्यांक काय आहे. संबधीत व्यक्तिच्या जन्मांकाबरोबरच तिचा भाग्यांकही तुम्हाला अनुकूल असेल तर अशी व्यक्ति तुमच्यासाठी जास्त चांगली ठरेल. वानगीदाखल समजा तुमचा जन्मांक 3 भाग्यांक 6 आहे. तर तुम्हाला ज्या व्यक्तिचा जन्मांक 3 आणि भाग्यांक 6 आहे, ती अगदीच योग्य ठरेल. त्याखालोखाल 3 चे मित्र नंबर असणारे 6 किंवा 9 हे जन्मांक असणारी आणि भाग्यांक 3 किंवा 9 असणारी व्यक्तिही तितकीच योग्य ठरेल.

कांही लोकांच्या बाबतीत जन्मांक मित्र नंबर आणि भाग्यांक शत्रू नंबर (किंवा याच्या उलटे) असण्याची शक्यता असते. अशा  वेळी त्यांच्यातील संबध कधी चांगले, कधी वाईट या प्रकारचे असतात. त्यांनी एकमेकांशी तडजोड केली तर त्यांचे संबध जिव्हाळ्याचे राहू शकतात आणि त्यांना एकमेकांचा फायदा होऊ शकतो.
यात आणखीही खोल विचार करता येतो, पण या लेखात एवढेच पुरे.

पुढे मी जन्मांक, भाग्यांक आणि त्यांचे मित्र अंक, शत्रू अंक याची माहिती देत आहे.

जन्मांक 1
मित्र अंक: 1, 5, 7
शत्रू अंक: 2, 4, 6

जन्मांक 2
मित्र अंक: 2, 4, 8
शत्रू अंक: 1, 5, 7

जन्मांक 3
मित्र अंक: 3, 6, 9
शत्रू अंक: 4, 7, 8

जन्मांक 4
मित्र अंक: 2, 4, 8
शत्रू अंक: 1, 3, 5, 9

जन्मांक 5
मित्र अंक: 1, 5, 7
शत्रू अंक: 2, 4, 6

जन्मांक 6
मित्र अंक: 3, 6, 9
शत्रू अंक: 1, 5, 7

जन्मांक 7
मित्र अंक: 1, 5, 7
शत्रू अंक: 2, 3, 6, 8

जन्मांक 8
मित्र अंक: 2, 4, 8
शत्रू अंक: 3, 7, 9

जन्मांक 9
मित्र अंक: 3, 6, 9
शत्रू अंक: 4, 8

कांही लोकांचे जन्मांक मित्र नंबर नसतानाही त्यांच्यात चांगली मैत्री दिसते, त्याचे कारण त्या दोघांचा भाग्यांक एकाच असतो किंवा ते मित्र नंबर असतात.

जन्मांक आणि भाग्यांक कसे काढायचे त्याची माहिती पुढील लिंक्सवर वाचा:
जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?
भाग्यांक म्हणजे काय?      

हेही वाचा:
तुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे
अंक आणि करीअर
अंकशास्त्र आणि मुहुर्त
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

1 comment:

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख