Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 17 January 2016

अंकशास्त्र: अमिताभ बच्चन

महावीर सांगलीकर 
8149703595


अमिताभ बच्चन हे हिंदी सिनेमाचे बादशाह म्हणून ओळखले जातात. त्यांची जन्मतारीख 11.10.1942 ही आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 2 तर भाग्यांक 1 आहे. त्यांच्या Amitabh Bachchan या नावानुसार त्यांचा नामांक 4 येतो.

जन्मतारीख 11
11 हा एक मास्टर नंबर आहे. या नंबरमुळे ते त्यांच्या क्षेत्रातले मास्टर  बनले आहेत. या अंकाने त्यांना प्रचंड यश मिळवून दिले आहे.

जन्मांक 2 
11=1+1=2
 जन्मांक 2 असणाऱ्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ठ्ये म्हणजे त्या हसतमुख, मनमिळाऊ आणि मृदुभाषी असतात. त्या बहुधा भांडणतंटे, वादविवाद यापासून दूर रहातात. त्यांना टीका करायला सहसा आवडत नाही. अमिताभ बच्चन यांच्यात हे गुण दिसून येतात. स्वत:ला प्रेसेंट करण्यात अमिताभ बच्चन कुशल आहेत, हा 2 या अंकाचाच गुण आहे. (सेल्समनशिप).

भाग्यांक 1 
11.10.1942
1+1+1+0+1+9+4+2=19=1+9=10=1+0=1
1 या भाग्यांकाने त्यांना त्यांच्या क्षेत्रातले ‘दादा’ बनवले आहे.  (इथे तुम्हाला असे दिसेल की त्यांच्या 11.10.1942 या जन्मतारखेत 1 हा अंक चार वेळा आला आहे. एखादा अंक या प्रकारे अनेकदा आला तर त्या अंकाचे गुणदोष संबधीत व्यक्तित वाढतात).

नामांक 4 
AMITABH
1492128 पूर्ण बेरीज 27=2+7=9
BACHCHAN
21383815=31=3+1=4
9+4=13=1+3=4

हा नामांक त्यांना तर्कशुद्ध विचार करण्याची ताकत आणि इतरांपेक्षा वेगळी विचारसरणी देतो. त्यांचा नामांक काढताना त्यात 13 हा अंक येतो. 13 हा अंक त्यांना कांही गूढ शक्ति देतो, तसेच कौटुंबिक कलह निर्माण करतो. त्यांचा नामांक काढताना 1 हा अंक चार वेळा आला आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणजे त्यांची जन्मतारीख आणि नाव यात 1 हा अंक एकूण आठ वेळा आला आहे.

त्यांच्या AMITABH या नावाचा नामांक 9 येतो, जो त्यांच्या जीवनात अडथळे आणणारा ठरतो.

जाता जाता मला आणखी एक उल्लेख करावासा वाटतो. हिंदी सिनेमाचे आधीचे बादशाह दिलीप कुमार यांची जन्मतारीखही 11 आहे, आणि त्यांचा भाग्यांकही 1 आहे! (11.12.1922). त्यांच्या पूर्ण जन्मतारखेतही बच्चन यांच्यासारखाच 1 हा अंकही चार वेळा आला आहे. हा योगायोग नसून अंकशास्त्रीय साम्य आहे आणि या साम्यामुळेच त्यांच्या कर्तृत्वात देखील बरेचसे साम्य आहे.

हेही वाचा:
जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29
शक्तिशाली मास्टर नंबर्स 
मार्क झुकेरबर्ग
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख