Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 12 March 2016

अंकशास्त्र: स्मिता पाटील

-महावीर सांगलीकर
8149703595


स्मिता पाटील या  मराठी आणि हिंदी सिनेमातली एक गाजलेल्या हिरोईन होत्या. शिवाय त्या सुरवातीला मुंबई दूरदर्शनवरून मराठी बातम्या देण्याचे कामही करत असत.

स्मिता पाटील यांची  जन्मतारीख 17 ऑक्टोबर 1955 ही होती. त्यानुसार त्यांचा जन्मांक 8 तर भाग्यांक 2 येतो. (17=1+7=8, 17.10.1955= 8+1+20=29=2+9=11=1+1=2). तसेच त्यांच्या Smita या नावाची अंकातली किंमतही 17 येते. (SMITA= 1+4+9+2+1=17). त्यांचे जन्मसाल असलेल्या  1955 मधील अंकाची बेरीज 20=2 म्हणजे त्यांच्या भाग्यांकाएवढी येते. म्हणजे त्यांच्या चार्टमध्ये 17(8) आणि 2 हे अंक  रिपिट झाले आहेत.

माझा आजवरचा अनुभव सांगतो की 8 जन्मांक असणारी व्यक्ति 5 जन्मांक असणाऱ्या व्यक्तिच्या, किंवा 5 या अंकाच्या संपर्कात आली तर तिला फटका बसू शकतो. स्मिता पाटील यांच्या बाबतीतही अशी गोष्ट घडली आहे.

स्मिता पाटील यांचे लग्न राज बब्बर यांच्याशी झाले. राज बब्बर यांची जन्मतारीख 23 जून 1952 ही आहे.  (जन्मांक 5, भाग्यांक 1). या दोघांच्या बाबतीत असे दिसून येते की दोघांचा जन्मांक (8-5) आणि भाग्यांक (2-1) हे एकमेकांना अनुकूल नाहीत.

लग्नानंतर या जोडप्याला एक मुलगा झाला, त्यानंतर केवळ दोनच आठवड्यात स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला.

इथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. मुंबई या नावाची अंकातली किंमत 5 आहे, (MUMBAI= 4+3+4+2+1+9=23=2+3=5). त्यामुळे हे शहर जन्मांक 8 असणाऱ्या व्यक्तिंना सहसा लाभदायक ठरत नाही.

विशेष म्हणजे स्मिता पाटील यांचा मृत्यू ज्या तारखेस झाला, ती तारीखही वैशिष्ठ्यपूर्ण होती.  त्यांचा मृत्यू 13.12.1986 रोजी झाला. या तारखेतील अंकांची पूर्ण बेरीज 31 येते (13==4, 31==4), आणि त्यावेळी स्मिता पाटील यांनी आपल्या वयाची 31 वर्षे पूर्ण केली होती!

हेही वाचा:
इंदिरा गांधी
नरेंद्र मोदी
अमिताभ बच्चन 
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख