Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Thursday, 31 March 2016

बाळासाहेब ठाकरे

-महावीर सांगलीकर 
Numerologist & Motivator
8149703595बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे इथे झाला. (विशेष म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जन्मतारीखही 23 जानेवारी होती.).

बाळासाहेबांचा जन्मांक 5 तर भाग्यांक 6 होता. त्यांच्या Bal Thakrey या नावानुसार आणि Balasaheb Thakrey या नावानुसारही त्यांचा नामांक 4 होता. विशेष  म्हणजे त्यांच्या Bal Thakrey या  नावांनुसार त्यांचा सोल अर्ज नंबर देखील त्यांच्या जन्मांकाएवढा म्हणजे 5 होता!

जन्मांक:
23= 2+3=5

भाग्यांक:
23.01.1926=(2+3) + (0+1) + (1+9+2+6) =5+1+18 =24=2+4=6

नामांक: 
BALASAHEB THAKREY
213111852  + 2812957
24 + 34= 58=5+8=13=1+3=4

BAL THAKREY
213   2812957
6     + 34 =40 =4+0=4

सोल अर्ज नंबर 
BAL THAKREY
  1         1     5 7 = 14 = 1+4 =5 


बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर  5 या सर्वात जास्त प्रभाव पडलेला दिसतो. जन्मांक 5 चे पुढे दिलेले महत्वाचे गुण बघितले तर ही गोष्ट स्पष्ट दिसून येते.

जन्मांक 5 चे गुण: 
प्रभावी वक्तृत्व, हजरजबाबीपणा, चित्रकलेची आवड, झटपट विचार करण्याची आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता. हा अंक मेडिया आणि पत्रकारीतेशीही संबंधीत आहे. जन्मांक 5 असणारे लोक स्वतंत्र प्रवृत्तीचे असतात, त्यामुळे ते सहसा कुणाच्या हाताखाली काम करू शकत नाहीत. (Be your own boss ही उक्ति ते अमलात आणत असतात).

आपणास माहीत आहेच की बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तृत्व अतिशय प्रभावशाली होते आणि कोणत्याही बाबतीत ते झटपट निर्णय घेत असत. त्यांना चित्रकलेची आवड होती आणि एक उत्कृष्ट व्यंग चित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या करीअरची सुरवात Free Press Journal या इंग्रजी दैनिकात व्यंग चित्रकार म्हणून केली. त्यांची व्यंगचित्रे टाईम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीतही प्रकाशित होत असत. नंतर त्यांनी  खास व्यंगचित्रांसाठी मार्मिक हे स्वत:चे मराठी साप्ताहिक सुरू केले.

भाग्यांक 6 चे गुण
जबाबदार आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व

नामांक 4 चे गुणदोष 
तर्कशुद्ध विचार, स्पष्टवक्तेपणा, सडेतोड भूमिका, बंडखोर वृत्ति. हा अंकही मेडिया आणि पत्रकारीतेशी संबधित आहे. विशेष म्हणजे त्यांच्या करीअरची सुरवात जिथून झाली त्या Free Press Journal आणि The Times of India या दोन्ही दैनिकांचा नामांक 4 आहे!

बाळासाहेब ठाकरे आणि मुंबई 
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात झाला असला तरी त्यांची कर्मभूमि मुंबई होती. MUMBAI या नावाची अंकातली किंमत 5 आहे. (4+3+4+2+1+9=23=2+3=5). तसेच MUMBAI या नावाचा सोल अर्ज नंबर आहे 4. (U = 3 + A = 1 + I =9 = 13 = 1+3 =4). 5 हा बाळासाहेबांचा जन्मांक तर 4 हा नामांक. त्यामुळे मुंबई हे शहर त्यांना फारच लाभदायक ठरले.हेही वाचा:

जन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23
मार्क झुकेरबर्ग
इंदिरा गांधी
अंकशास्त्र: नरेंद्र मोदी
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
An Introduction to Numerology
Numerology: Characteristics of Birth Number 1 Persons 
Numerology: Your Number and Your Career
Motivation: How Numerology Changed My Life?

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख