Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 5 April 2016

प्राचार्य आ. भा. मगदूम

-महावीर सांगलीकर 
8149703595प्राचार्य आ. भा. मगदूम हे रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य होते आणि संस्थेचे सचिव होऊन ते निवृत्त झाले. त्यांचे प्राथमिक आणि शालेय शिक्षण रयत शिक्षण संस्थेतच झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले. नंतर कांही काळ फर्ग्युसन कॉलेजमध्ये ट्यूटर  म्हणून काम केल्यावर ते रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांचा आवडीचा आणि शिकवण्याचा प्रमुख विषय गणित हा होता. त्यांनी गणित या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

22 या अंकाचा गणित या विषयाशी विशेष संबंध आहे.  22 हा एक मास्टर नंबर आहे. या अंकाशी संबधीत लोक तर्कशुद्ध आणि सूक्ष्म विचार करणारे, नाण्याची दुसरी बाजू पहाणारे, स्पष्टवक्ते, लोकोपयोगी, सकारात्मक  कामे करणारे असतात. ही सगळी वैशिष्ठ्ये प्राचार्य आ. भा. मगदूम यांच्या दिसून येत. त्यांची जन्मतारीख होती 6 नोव्हेंबर 1922.

6.11.1922 या तारखेतील अंकाची बेरीज 22 येते. तसेच जन्मसालातही 22 हा अंक आला आहे. या शिवाय या तारखेत 11 हा मास्टर नंबर आहे. 22 हा जन्मांक किंवा भाग्यांक असणाऱ्या व्यक्तिंच्या बाबतीत 2, 4 आणि 8 हे अंक महत्वाचे ठरतात, आणि त्यांच्या जीवनात ते परत परत आलेले दिसतात.

त्यांची जन्मतारीख आणि त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रमुख घटनांची वर्षे वैशिष्ठ्यपूर्ण आहेत.

आता आपण प्राचार्य आ. भा. मगदूम यांच्या जीवनात घडलेल्या महत्वाच्या घटना पाहू:
1934: सातवी परीक्षा उत्तीर्ण
1934 या सालातील अंकांची बेरीज 8 येते.
1939: मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्कृष्ठ गुणांनी उत्तीर्ण. त्या काळात या परीक्षेला फारच महत्व होते.
1939 या सालातील अंकांची बेरीज 22 येते.
1943: पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश
1943 या सालातील अंकांची बेरीज 8 येते.
1948: मुंबई विद्यापीठाची बी.टी. पदवी उत्तीर्ण. विद्यापीठात पहिला क्रमांक. रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे सभासद म्हणून निवड.
1948 या सालातील अंकांची बेरीज 22 येते.
1955: एम.एड. परीक्षा उत्तीर्ण
1955 या सालातील अंकांची बेरीज 2 येते.
1982: रयत शिक्षण संस्थेच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त
1982 या सालातील अंकांची बेरीज 2 येते.

मृत्यू: 22 जून 2006
इथे 22 हा अंक पुन्हा आला आहे. शिवाय 2006 या सालातील अंकांची बेरीज 8 येते.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख