Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Thursday, 14 April 2016

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

-महावीर सांगलीकर
8149703595


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मतारीख 14 एप्रिल 1891 ही होती. त्यानुसार त्यांचा जन्मांक 5 आणि भाग्यांक 1 येतो.
जन्मांक 5
14 =1+4 =5
भाग्यांक 1
14.04.1891 = (1+4) + (4) + (1+8+9+1) = 5+4+19 =28 =2+8=10=1+0=1

जन्मांक 5 चे गुण: 
प्रभावी वक्तृत्व, प्रभावी लिखाण, स्पष्टवक्तेपणा, हजरजबाबीपणा, झटपट विचार करण्याची आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता. हा अंक कायदा, मेडिया आणि पत्रकारीतेशीही संबंधीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेतज्ञ होते, शिवार ते पत्रकार होते  हे आपणास माहीत आहेच.

जन्मांक 5 असणारे लोक स्वतंत्र प्रवृत्तीचे असतात, त्यामुळे ते सहसा कुणाच्या हाताखाली काम करू शकत नाहीत. त्यांचा जन्म नोकरी करण्यासाठी झालेला नसतो. बाबासाहेबांच्या बाबतीत ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते.

बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचा सर्वाधिक संबंध मुंबई या शहराशी आला. त्यांचा अंतिम संस्कार देखील मुंबई येथे झाले. त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथे घेतली. MHOW, MUMBAI आणि NAGPUR या तीनही शहरांचा नामांक 5 म्हणजे बाबासाहेबांच्या जन्मांकाएवढी आहे.

विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई-वडिलांचे 14वे अपत्य होते!

जन्मांक 5 असणारे, त्यातही 14 या विशिष्ट तारखेस जन्मलेले लोक बंडखोर विचार सरणीचे आणि विशिष्ट ध्येयाने झपाटलेले असतात. बाबासाहेबांच्या बाबतीत ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते.

भाग्यांक 1 चे गुण:
1 हा अंक लीडरशिप, पुढाकार घेण्याशी आणि वेगळ्या प्रकारच्या कामाची सुरवात करण्याशी आहे. बाबासाहेबांच्यामध्ये हे गुण होतेच. त्यांचे जन्मसाल 1891 मधील अंकांची बेरीजही 1 येते. (1+8+9+1=19=1+9=10=1+0=1).  ही गोष्ट त्यांच्या भाग्यांकाचे गुण वाढवते.
1 हा अंक 5 या अंकाचा मित्र नंबर आहे. जन्मांक आणि भाग्यांक मित्र नंबर असणे हे त्या व्यक्तिच्या गुणांना मोठा वाव देते.

नामांक 
बाबासाहेबांचा नामांक 6 होता. 6 हा अंक जबाबदार आणि कृतीशील व्यक्तिंचा अंक असतो.  त्यांच्या नावाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्या Babasaheb या नावाची अंकातली किंमत 5 म्हणजे त्यांच्या जन्मांकाएवढी होती तर Ambedkar या आडनावाची अंकातली किंमत 1 म्हणजे त्यांच्या भाग्यांकाएवढी होती. ही गोष्ट त्यांच्या जन्मांक व भाग्यांकाचे गुण वाढवणारी ठरली.

प्रमुख घटना: 
बाबासाहेबांच्या जीवनातल्या प्रमुख घटनांमध्ये सर्वाधिक महत्वाची घटना म्हणजे त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार. याच दिवशी त्यांनी रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली. 14 ही तारीख त्यांची जन्मतारीख आहे. 14=1+4 = 5. बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा 13 ऑक्टोबर 1935 रोजी केली होती. या तारखेतील अंकांची बेरीजही 5 येते. [ 13.10.1935 = (1+3) + (1+0) + (1+9+3+5) = 4+1+18 =23=2+3=5 ]. बाबासाहेबांचे दुसरे लग्न 15 एप्रिल 1948 रोजी झाले. 15.4.1948 मधील अंकाची बेरीज 5 येते. [15.4.1948 = (1+5) + (4) + (1+9+4+8) =6+4+22=32=3+2=5 ]

हेही वाचा: 
इंदिरा गांधी
बाळासाहेब ठाकरे
अंक आणि करीअर
तुमच्या सहीत दडलंय तुमचे व्यक्तिमत्व 
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन  

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख