Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 23 April 2016

तुमचा लकी मोबाईल नंबर

-महावीर सांगलीकर 
8149703595

तुमच्याशी संबधित सगळेच अंक तुमच्यावर बरावाईट परिणाम करत असतात. तुमच्या मोबाईल फोनचा नंबरही याला अपवाद नाही. तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकानुसार योग्य मोबाईल नंबर घेतल्यास त्याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो.

मोबाईल फोनचा  नंबर 10 अंकी असतो. त्यातील शेवटचे चार अंकच तुमच्याशी संबधीत असतात. त्या आधीचे अंक एरिया कोड वगैरे असतात. त्यामुळे अंकशास्त्रानुसार मोबाईल फोन नंबर घेताना सहसा शेवटच्या चार अंकाचाच विचार केला जातो. या शेवटच्या चार अंकाची बेरीज तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकाएवढी असली तर तो नंबर तुमच्यासाठी लकी किंवा अनुकूल नंबर ठरतो. (जन्मांक किंवा भाग्यांक  कसा काढावा याची माहिती जन्मांक (मुळांक) म्हणजे काय? तसेच भाग्यांक म्हणजे काय? येथे वाचावी).

उदाहरणार्थ, तुमची जन्मतारीख 15 मार्च 1992 आहे असे समजू. या तारखेनुसार तुमचा जन्मांक 6 आहे (15=1+5=6) तर भाग्यांक 3 आहे. [15.03.1992 =(1+5) + (0+ 3) + (1+9+9+2) =6+3+21= 30=3+0=3]. आता तुमच्यासाठी योग्य नंबर शेवटचे असे चार अंक असतील की ज्यांची बेरीज 6 किंवा 3 येते. इथे तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की हे अंक (आणि एकूणच 10 अंक) लोकांसाठी लक्षात ठेवण्याजोगे असावेत.
वरील जन्मांक 6 किंवा भाग्यांक 3 नुसार लक्षात ठेवण्यास सोपे नंबर पुढील प्रमाणे आहेत:


1500
6000
3300
3000 
0015
0006
0033 
0015
0003

याशिवाय जन्मसाल असलेल्या 1992 मधील अंकाची बेरीज देखील 3 येते, त्यामुळे 1992 हा नंबर तुमच्यासाठी जास्त लकी ठरतो.  तुमच्या जन्मसालातील अंकाची बेरीज तुमच्या जन्मांकाएवढी किंवा भाग्यांकाएवढी येत असेल तर तुम्ही तुमचे जन्मसाल असणारा नंबर अवश्य घ्यावा.

समजा वरीलपैकी कोणताच नंबर मिळू शकाल नाही तर मग तुम्ही ज्यांची बेरीज 6 किंवा 3 येते असे इतर नंबर्स शोधले पाहिजेत.

शेवटच्या चार अंकांना महत्व असले तरी संपूर्ण 10 आकडी नंबरमधील अंकाची बेरीज देखील 6 किंवा 3 आली तर ते जास्त चांगले ठरेल.

ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 8 असेल त्यांनी ज्यांची बेरीज 8 येते असे नंबर्स टाळावेत, कारण 8 हा अंक रिपीट करणे लाभदायक नसते).


हेही वाचा: 
गाड्यांसाठी नंबर निवडताना.......
मित्र अंक, शत्रू अंक
तुमच्या सहीत दडलंय तुमचे व्यक्तिमत्व
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख