Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Thursday, 30 June 2016

अंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे!

-महावीर सांगलीकर 
9145318228


अनेक लोक, इतकेच नव्हे तर मराठीतून न्यूमरॉलॉजी शिकवणाऱ्या कांही संस्था देखील न्यूमरॉलॉजी या शब्दाचं मराठी भाषांतर संख्याशास्त्र असं चुकीचं करतात. खरं म्हणजे न्यूमरॉलॉजी या शब्दाचं मराठी भाषांतर अंकशास्त्र असंच होतं. मराठीत शिक्षण क्षेत्र, मिडिया वगैरे सगळीकड संख्याशास्त्र हा शब्द स्टॅटिस्टिक या इंग्रजी शब्दासाठी वापरला जातो. त्यामुळं संख्याशास्त्र हा शब्द स्टॅटिस्टिक या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द आहे, न्यूमरॉलॉजी या शब्दाचा नव्हे.

अंकशास्त्र आणि संख्याशास्त्र यात नेमका काय फरक आहे ते पाहुया.

संख्याशास्त्र ही गणिताची एक शाखा असून या शास्त्राचा उपयोग मोठी आकडेवारी गोळा करून तिचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. हा अभ्यास अर्थशास्त्र, जनगणना, प्राणिगणना, वैज्ञानिक संशोधन इत्यादी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातो.

याउलट अंकशास्त्र हे एखाद्या व्यक्तिची जन्मतारीख आणि नाव यावरून त्या व्यक्तिचे व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी केला जातो. जन्मतारीख ही संख्या नसून अंक आहेत ही गोष्ट ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून तर जन्मांक, भाग्यांक हे शब्द वापरले जातात. जन्मसंख्या,  भाग्यसंख्या असे शब्द अंकशास्त्राला संख्याशास्त्र म्हणणारेही वापरत नसतात.

संख्याशास्त्र हे गणित असून अंकशास्त्र ही गूढविद्या आहे.  त्यामुळे अंकशास्त्रासाठी संख्याशास्त्र हा शब्द वापरणे पूर्ण चुकीचे ठरते.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

Email Newsletter

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख