Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 20 November 2016

ज्योतिषांचं अंकशास्त्र!

-महावीर सांगलीकर 
मोबाईल नंबर 8149703595
भारतात अंकशास्त्राची प्रॅक्टिस करणारे लोक जास्त करून ज्योतिषी आहेत. हे ज्योतिषी अंकशास्त्राला ज्योतिषशास्त्राची एक शाखा समजतात. त्यांचं अंकशास्त्राविषयीचं ज्ञान पारंपारिक आणि अतिशय तोकडं, कित्येकदा खूपच चुकीचं असत. अंकशास्त्रात गेल्या 100 वर्षात प्रचंड संशोधन झालेलं आहे. पण ज्योतिषी असणाऱ्या अंकशास्त्रींना त्याची कांहीच माहिती नसते.  नाहीतरी एकूणच परंपरावादी भारतीयांना नव्या संशोधनाचं वावडंच असतं.

अंकशास्त्राची प्रॅक्टिस करणारे बहुतेक भारतीय ज्योतिषी अंकशास्त्र हे प्राचीन भारतीय शास्त्र आहे असं मानतात. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ते ज्योतिषी अंकशास्त्रासाठी तिथींचा नव्हे तर इंग्रजी तारखांचा वापर करतात. व्यक्तिच्या नावाच्या इंग्रजी अक्षरांनुसार गणित मांडतात, देवनागरी अक्षरानुसार नव्हे. याचाच अर्थ अंकशास्त्र हे भारतीय शास्त्र नाही आहे. ते भारतीय शास्त्र असते तर ज्योतिषशास्त्रात जसा तिथ्यांचा विचार केला जातो, तसाच त्यांनी अंकशास्त्रात देखील तिथ्यांचाच विचार केला असता, तसेच देवनागरी अथवा भारतीय अक्षरांचा विचार केला असता. असो. अंकशास्त्राला प्राचीन भारतीय शास्त्र म्हणणे म्हणजे प्राचीन काळी आमच्याकडे आगगाड्या होत्या असं म्हणण्यासारखंच आहे. (नाही म्हणायला प्राचीन तमिळ लोकांना अंकशास्त्राची थोडी माहिती होती, पण त्यांचे अंकशास्त्र ज्यूंच्या किंवा पायथॅगोरसच्या अंकशास्त्राएवढे विकसित नव्हते आणि भारतीय ज्योतिषी तमिळ अंकशास्त्राची प्रॅक्टिस करत नसतात).

अनेक ज्योतिषी जन्मांक (Birth Number) आणि भाग्यांक (Life Path Number) या शब्दांच्या बाबतीत घोळ करतात. जन्मांकाला भाग्यांक आणि भाग्यांकाला जन्मांक म्हणण्याचा प्रकार त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर होतो. बहुतेक ज्योतिषांना अंकशास्त्रातील मास्टर नंबर्स, पर्सनल इयर नंबर, चलेंज नंबर्स, लाईफ सायकल्स वगैरे अनेक गोष्टींची माहिती नसते. आधुनिक अंकशास्त्राचा जनक पायथॅगोरस हा आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी त्याला मास्टर नंबर्स माहीत होते, पण अंकशास्त्राची प्रॅक्टिस करणाऱ्या आजच्या ज्योतिषांना ते माहीत नसतात!  

हे ज्योतिषी अंकशास्त्राकडे ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणूनच बघत असल्याने ते आपल्या क्लाएंट्स ना जो सल्ला देतात, उपाय सुचवतात त्यावर ज्योतिषशास्त्राचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे अंकशास्त्रीय उपाय सुचवण्याऐवजी ते खडे, अंगठ्या, कर्मकांड, पूजा-अर्चा असले उपाय सुचवतात. खरं म्हणजे  अंकशास्त्रीय उपाय हे अंक, नावाचे स्पेलिंग, रंग यांच्याशीच संबधीत असतात आणि असायला पाहिजेत.

अंकशास्त्रात ज्योतिष शास्त्र, ग्रहगोल, राशी, नक्षत्रे, तिथि यांचा अजिबात विचार केला जात नाही. पण ज्योतिषशास्त्र अंकांशिवाय चालू शकत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळं ज्योतिषशास्त्र हे अंकशास्त्रावर आधारीत आहे असं म्हणायला पाहिजे.

तुम्हाला जर अंकशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर दोन गोष्टींकडे तुम्ही कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही (अगदी ज्योतिषी असला तरी) अंकशास्त्र आणि ज्योतिष शास्त्र या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि अंकशास्त्राचा अभ्यास करताना ज्योतिष शास्त्रीय दृष्टीकोन बाजूला ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे परंपरावादातून बाहेर पडून अंकशास्त्रातले अद्ययावत ज्ञान मिळवायला पाहिजे. केवळ जुन्या ज्ञानावर अवलंबून राहिलात तर त्याचा तुम्हाला कांही उपयोग होणार नाही.हेही वाचा:
तुमची जन्मतारीख आणि तुमचा जन्मांक
तुमचा लकी मोबाईल नंबर
स्वप्ने आणि त्यांचे गूढ अर्थ
कौटुंबिक समस्या आणि अंकशास्त्र
तुमच्या बिझनेसचं नाव

No comments:

Post a Comment

Email Newsletter

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख