Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 26 February 2017

राशिभविष्य वाचू नका!


-महावीर सांगलीकर पेपरमध्ये रोज त्या दिवसाचं एखाद्या ओळीचं आणि दर रविवारी थोडं विस्तारानं आठवडाभराचं प्रत्येक राशीचं भविष्य येत असतं. हे भविष्य जनरलाईझड प्रकारचं असतं. त्यात कांही राशींचं भविष्य चांगलं, काहींचं थोडं चांगलं थोडं वाईट आणि काहींचं वाईट दिलेलं असतं. अनेकजण हे भविष्य गंभीरपणे तर इतर अनेकजण टाईमपास, करमणूक म्हणून वाचत असतात.

तुम्ही जेंव्हा तुमच्या राशीचं भविष्य वाचता, त्यावेळी तीन गोष्टी होऊ शकतात. पहिली म्हणजे ते भविष्य चांगलं असेल तर तुम्ही खूश होता, थोडं चांगलं थोडं वाईट असेल तर थोडं खूश, थोडं दु:खी होता आणि वाईट असेल तर काळजीत पडता. त्यातून तुमच्या सुप्त मनाला चांगला किंवा वाईट संदेश जातो. जर तुमचं भविष्य चांगलं दिलं असेल तर तुमच्या सुप्त मनाला चांगला संदेश पोहोचतो. अॅटो सजेशनमुळं, लॉ ऑफ अॅट्रॅक्शनच्या नियमानुसार पुढे खरंच कांही चांगल्या गोष्टी घडू शकतात. याउलट जर भविष्य वाईट लिहिलेलं असेल वाईट घडू शकतं. सकाळी सकाळी तुम्ही ‘दिवस वाईट जाईल,’ ‘आरोग्य बिघडण्याची शक्यता’ असं भविष्य वाचलं तर तुमचा तो दिवस वाईट जाण्याचीच, तुमचं आरोग्य खरंच बिघडण्याची शक्यता. तुम्ही हे भविष्य करमणूक किंवा टाईमपास म्हणून वाचलं असलं तरी त्याचे तुमच्या सुप्त मनावर परिणाम होणारच.

तुमचं भविष्य चांगलं लिहिलं आहे की वाईट आहे हे तुम्हाला तुम्ही ते वाचल्यावरच कळेल. पण मग विषाची परीक्षा घ्यायची कशाला? त्यापेक्षा तुम्ही ते न वाचलेलं बरं. राशिभविष्य वाचण्यापेक्षा तुम्ही तुमचं मन नेहमी पॉझिटिव्ह ठेवलं, तुम्हाला जसं पाहिजे आहे तसचं घडणार आहे असा विश्वास ठेवला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तुमचं भविष्य तुमची रास, ग्रहगोल यांच्यावर अवलंबून नसून ते तुमचं मन कशा प्रकारचा विचार करते यावर अवलंबून असतं.

मुळात भविष्य लिहिणाऱ्यानी निगेटिव्ह भविष्य लिहायचं टाळलं पाहिजे. पण तेवढं तारतम्य त्यांना नसतं, आणि तुम्ही त्यांना समजाऊनही सांगू  शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही राशिभविष्य वाचण्याचं टाळलं पाहिजे.

काय वाचावं याबरोबरच काय वाचू नये हे कळणं देखील महत्वाचं असतं.हेही वाचा:

No comments:

Post a Comment

Email Newsletter

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख