Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 6 March 2017

तुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष

-महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
8149703595तुमच्या जन्मांकानुसार तुमच्यात कांही स्वभावदोष येतात आणि त्यानुसार तुमच्याकडे कांही चुकीच्या गोष्टी आकर्षित होतात. तुमच्या जन्मांकाचे स्वभावदोष तुमच्यात थोड्या-अधिक प्रमाणात डेव्हलोप झाले असतील तर तुमच्याकडे नक्कीच वाईट गोष्टी आकर्षित होतात. असे होऊ नये म्हणून तुम्ही नेहमी सावध राहिले पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमचे स्वभावदोष दूर केले पाहिजेत. तसेच तुमच्या जन्मांकाचे गुण तुमच्यात विकसित केले पाहिजेत. जन्मांकांच्या गुणांची माहिती मी नंतर देईन. आधी दोष दूर केले पाहिजेत म्हणजे नंतर गुणांचा परिणामकारक उपयोग करता येईल.

तुमचा जन्मांक हा तुमच्या जन्मतारखेनुसार ठरतो. तो कसा काढायचा याची माहिती या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर वाचावी.

पुढे प्रत्येक जन्मांकाचे स्वभावदोष आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती दिली आहे:

जन्मांक 1: हा लीडरशिपचा नंबर आहे. तुमच्यात तुमचे निगेटिव्ह गुण डेव्हलोप झालेले असतील तर तुमच्यामध्ये हुकुमशाही वृत्ती, अरेरावी, बॉसिंग अशा गोष्टी येऊ शकतात. तुम्हाला अनेक शत्रू आणि स्पर्धक तयार होऊ शकतात. तुम्हाला ट्रॅप केलं जाऊ शकतं, त्यामुळं तुम्ही अडचणीत येऊ शकता.

जन्मांक 2: हा अंक तुम्हाला चंचल मनाचा बनवतो. त्यामुळे तुमच्यात धरसोड वृत्ती येऊ शकते. तुमचा मूड सतत बदलता रहातो. तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं. विरुद्धलिंगी व्यक्तिंच्याबद्दल जास्त आकर्षण असल्याने तुमचे विवाहबाह्य, अनैतिक संबंध तयार होऊ शकतात.

जन्मांक 3:  तुमच्या मदत करण्याच्या स्वभावामुळं लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. शिवाय प्रेमळ, मैत्रीपूर्ण वागण्यामुळं तुमचे विवाहबाह्य आणि अनैतिक संबध तयार होऊ शकतात. खर्चिक स्वभावामुळं उतारवयात तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात.  अनेक विषयात रस असल्याने एका ठिकाणी लक्ष केंद्रित करता येणार नाही.

जन्मांक 4: तुमचा स्पष्टवक्ता स्वभाव आणि लॉजिकल विचार तुम्हाला अडचणीचे ठरू शकतात. तुमचा  स्पष्टवक्तेपणा फटकळपणा बनू शकतो आणि त्यातून लोक दुखावले जाऊ शकतात. नातेसंबधात समस्या निर्माण होऊ शकतात. तुमची मी म्हणतो तेच खरं ही वृत्ती लोकांना तुमच्यापासून दूर करू शकते.

जन्मांक 5: तुम्हाला छोट्या-छोट्या कारणांमुळं डिप्रेशन येऊ शकतं. झटपट पैसे मिळवण्याचा, हेराफेरी करण्याचा मोह होऊ शकतो. यातून तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता. तुमचे विवाहबाह्य आणि अनैतिक संबध तयार होऊ शकतात. बदनामी होऊ शकते.

जन्मांक 6: तुमच्या स्वभावात फारसे दोष नाहीत. पण तुमच्या मदत करण्याच्या स्वभावामुळं लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.

जन्मांक 7: हा अंक तुम्हाला स्वकेंद्रित, सिक्रेटीव्ह, रिझर्व माइंडेड आणि वेळप्रसंगी बेचैन बनवतो. स्वत:च्याच नादात राहिल्याने तुम्ही कुटुंबीय, मित्र मंडळी यांना फारसा वेळ देऊ शकत नाही. तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं.

जन्मांक 8: तुमच्या आळशी स्वभावामुळं तुम्हाला मिळणाऱ्या चांगल्या संध्या तुम्ही गमावता. रिझर्व माइंडमुळं, व्यक्त न झाल्यानं, समाजात फारसं न मिसळल्यामुळं तुमचा तोटा होऊ शकतो. तुम्ही वरच्या पदावर काम करत असाल तर तुमच्याकडून सत्तेचा गैरवापर, बॉसिंग होऊ शकतं.

जन्मांक 9: तुमच्या हाय टेम्परमुळं भांडणे, कलह, वाद होऊ शकतात. तुम्ही नेहमी असमाधानी रहाण्याची शक्यता असते.

वरील जन्मांकाशिवाय पुढील जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींचे कांही वेगळे दोष असतात:

जन्मांक 11: तुमच्यात येणारे दुर्गुण जन्मांक 2 नुसार आहेत. याशिवाय तुम्ही धर्माच्या अतिआहारी जाण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमच्या विचारांच्या व्यापकतेवर मर्यादा येऊ शकतात. तुम्ही संकुचित विचारांचे बननायाची शक्यता असते.

जन्मांक 13: तुमच्यामध्ये जन्मांक 4चे दुर्गुण जास्त प्रमाणावर येऊ शकतात. तुमच्यामुळं कुटुंबात, अशांती तयार होऊ शकते. तुमचा मानसिक तणाव प्रमाणाबाहेर वाढू शकतो. तुमच्याबद्दल गैरसमज तयार होऊ शकतात. वागण्या-बोलण्यात लवचिकता नसल्याने तुमचे नुकसान होते.

जन्मांक 22: तुमच्यामध्ये जन्मांक 4चे दुर्गुण जास्त प्रमाणावर येऊ शकतात, तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात, हुकुमशाही प्रवृत्ती, हेकेखोरपणा वाढू शकतो. तुमच्यात स्वार्थीपणा येऊ शकतो. तुमच्याकडून सत्तेचा, पदाचा दुरुपयोग होऊ शकतो. तुम्ही दुसऱ्यांच्या मतांचा सहसा आदर करणार नाही.

जन्मांक 26: जन्मांक 8 चे दुर्गुण जास्त प्रमाणावर येऊ शकतात. तुमच्यावर मोठी संकटं, आपत्त्या येऊ शकतात. कौटुंबिक समस्या, नातेसंबंध तुटणे होऊ शकतं.

हेही वाचा:

1 comment:

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख