Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday, 8 March 2017

महिलांच्या समस्या आणि स्वभाव

--महावीर सांगलीकर
8149703595

अंकशास्त्राची प्रॅक्टिस सुरू केल्यापासून माझ्या संपर्कात अनेक महिला आल्या. त्यांच्या समस्या सोडवताना मला महिलांच्या मानसिकतेचं जवळून दर्शन झालं. माझं निरीक्षण आहे कि बहुतेक महिला या पॉझिटीव्ह मनाच्या असतात. महिलांना येणाऱ्या समस्या या प्रामुख्यानं पुरुषांच्यामुळं येत असतात. हे पुरुष म्हणजे पती, बॉयफ्रेंड, पिता वगैरे. शिवाय समाजातील पुरुषी वृत्तीमुळंही महिलांना भयंकर त्रास होत असतो.

महिलांना इतर महिलांच्यामुळंही समस्या निर्माण होत असतात. महिलांना त्रासदायक ठरणाऱ्या महिला म्हणजे प्रामुख्यानं सासू, सून आणि कांही ठिकाणी तर चक्क आई! महिलांना महिलांच्यामुळं होणाऱ्या त्रासाची मोठी कारणं म्हणजे जनरेशन गॅप आणि त्रास देणाऱ्या महिलेचं रिकामटेकडं किंवा जेलस असणं.

मला येणारा आणखी एक अनुभव म्हणजे बऱ्याच महिलांना त्यांच्या समस्या दूर करण्यापेक्षा समस्या काय आहेत हे कुणालातरी सांगण्यात जास्त रस असतो. आपलं मन कोणा विश्वासू व्यक्तिकडं मोकळं करावं, त्या व्यक्तीनं ते लक्षपूर्वक ऐकून घ्यावं एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. मन मोकळं केलं, थोडंसं रडलं की त्यांना खूप बरं वाटतं आणि मग त्यांना त्यांच्या समस्या सुटल्याच असंच वाटतं.

अंकशास्त्र हा माझा व्यवसाय आहे तर मोटिव्हेट करणं हा माझा छंद आहे. दुसऱ्यांना मोटिव्हेट करण्यातला आनंद कांही वेगळाच असतो. गेल्या तीन वर्षात मी अनेक होतकरू मुलींना मोटिव्हेट केलं. दिशा न मिळालेल्या, निराश झालेल्या आणि अगदी आत्महत्या करायची मानसिकता झालेल्या महिलांना पॉझीटीव्ह बनवलं. कधी प्रत्यक्ष भेटून तर कधी केवळ फोनवर त्यांचं कौन्सिलिंग केलं. निरपेक्षपणे, फी न घेता. मला असा अनुभव आहे की महिलांना मोटिव्हेट करणं, पॉझीटीव्ह बनवणं पुरुषांच्या तुलनेत खूप सोपं असतं.

महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक जबाबदार, कुटुंबवत्सल, नातेसंबंध जपणाऱ्या, शहाण्या, प्रेमळ आणि हुशार असतात. त्यांच्यात नेमकेपणा असतो. खरं म्हणजे पुरुष हे केवळ शारीरिक दृष्ट्याच महीलांपेक्षा बलवान आहेत. इतर बाबतीत महिला पुरुषांच्यापेक्षा सरस असतात. महिला जास्त करून Constructive तर पुरुष हे Destructive Minded असतात. महिला Destructive झाल्या तर त्या स्वत:चंच नुकसान करून घेतील. Destructive पुरुष मात्र इतरांचं, समाजाचं मोठं नुकसान करतात.

उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यात महिला पुरुषांच्या खूप पुढे निघून जातील. तेंव्हा त्यांना पुरुषांची गरजच भासणार नाही. अगदी मुलांना जन्म देण्यासाठी सुद्धा. कारण टेक्नॉलॉजी एवढी पुढं गेलेली असेल कि ज्या महिलेला मूल पाहिजे ते केवळ तिच्याच पेशीपासून जन्माला घालता येईल.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख