Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 12 June 2017

तुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव


-महावीर सांगलीकर
Numerologist & Graphologist
8149703595


तुमच्या जीवनावर जे वेगवेगळे अंक प्रभाव टाकतात, त्यात तुमचा भाग्यांक, जन्मांक, नामांक हे महत्वाचे अंक आहेत. त्याशिवाय कांही पूरक अंक असतात जे वरील अंकाचे गुणदोष कमी करण्याचे अथवा वाढवण्याचे काम करतात. अशा पूरक अंकांमध्ये तुमच्या जन्मसालानुसार येणारा अंक (वर्षांक, Birth Year) महत्वाचा असतो.

तुम्ही ज्या वर्षी जन्मला त्या वर्षातील अंकांची एक अंकी बेरीज म्हणजे तुमचा वर्षांक. उदाहरणार्थ समजा की तुमचा जन्म 1986 मध्ये झाला. आता या सालातील अंकांची बेरीज करा:

1+9+8+6 = 24 =2+4 =6
6 हा तुमचा वर्षांक आहे.

वर्षांकाचा तुमच्यावर विशिष्ट प्रभाव असतो, जो तुमच्या इतर अंकानुसार कमी अथवा जास्त होतो.
वर्षांक आणि त्यानुसार संबधित व्यक्तीमध्ये असणारे गुणदोष: (त्या व्यक्तीचा जन्मांक, भाग्यांक अथवा नामांक तोच असेल तर वर्षांकाचा प्रभाव वाढतो).

वर्षांक 1: पुढाकार, लीडरशिप, संघटन कौशल्य, परफेक्शन, स्वतंत्र वृत्ती, प्लॅनिंग, हुकुमशाही, बॉसिंग. हा वर्षांक संबधित व्यक्तीला लीडरशिपशी संबधित क्षेत्रात अतियशस्वी बनवू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 3, 5, 7, 8, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 2: व्यवहार कुशलता, मुत्सद्दीपणा, संभाषण चातुर्य, सौंदर्य दृष्टी, ज्ञानार्जन, चंचलता, धरसोडपणा, मूडी स्वभाव,  अफेअर्स.  हा वर्षांक त्या व्यक्तीला व्यापार, उद्योगात यशस्वी बनवू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 3, 4, 6, 8, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 3: उत्साह, मैत्रीपूर्ण, नेतृत्व, संघटन कौशल्य, जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती, अफेअर्स, स्वार्थी वृत्ती, एकावेळी अनेक ठिकाणी हात घालण्याची वृत्ती. हा वर्षांक त्या व्यक्तीला मनोरंजन क्षेत्रात यशस्वी बनवू शकतो.  हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 3, 5, 6, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 4: स्पष्टवक्तेपणा, सरळपणा, तर्कनिष्ठता, स्वतंत्र वृत्ती, प्लॅनिंग, परफेक्शन, फटकळपणा, धन-संपत्तीबद्दल उदासीनता. हा वर्षांक त्या व्यक्तीला टेक्नॉलॉजी आणि गणिताशी संबधीत व्यवसायात यशस्वी बनवू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 4, 6, 7,  8 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 5: जिनिअस, इंटेलेक्चुअल, मल्टीटॅलेंटेड, संशोधक वृत्ती, उदास, व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता, अफेअर्स.  हा वर्षांक त्या व्यक्तीला विविध क्षेत्रात यश देऊ शकतो.  हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 3, 5, 7, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 6: जबाबदार, कुटुंबवत्सल, आपले काम आणि कुटुंब यांनाच सर्वाज जास्त महत्व देण्याची प्रवृत्ती. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 3, 4, 6, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 7: अंतर्मुखता, चिंतन, आध्यात्मिकता, एकांतप्रियता, विश्लेषक बुद्धी, निरीक्षण शक्ती, स्वकेंद्रित वृत्ती, रिझर्व माइंडेड, बेचैनी. हा वर्षांक त्या व्यक्तीला आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात यश देऊ शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 4, 5, 7  असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 8: धन आणि संपत्ती, सत्ता, कौटुंबिक कलह, आळशीपणा, झटपट निर्णय घेण्यास टाळाटाळ, उशीर, स्वकेंद्रित वृत्ती, अति सावधानता. हा वर्षांक कौटुंबिक समस्या निर्माण करू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 2, 4, 6, 8 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 9: लढाऊ वृत्ती, संघर्ष, उशीर, हॉट टेम्पर. हा वर्षांक त्या व्यक्तीला जमिनीशी संबधित व्यवसायात तसेच आध्यात्मिक क्षेत्रात चांगले यश देऊ शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 3, 5, 6, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

याशिवाय जन्मवर्षातील अंकांची दोन अंकी बेरीज पुढील प्रमाणे येत असेल तर त्यांचेही कांही विशिष्ट आणि वेगळे गुणदोष असतात:

वर्षांक 11: वर्षांक 2 चे सर्व गुणदोष + आध्यात्मिकता. हा वर्षांक त्या व्यक्तीला आध्यात्मिक क्षेत्रात यश देऊ शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 3, 4, 6, 8, 9 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 13: वर्षांक 4 चे सर्व गुणदोष + काही गूढ शक्ती, इतरांना भडकावणारे बोलणे-वागणे. हा वर्षांक त्या व्यक्तीला गूढ विद्यांमध्ये पारंगत करू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 4, 6, 7,  8 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 22: वर्षांक 4 चे सर्व गुणदोष + आपल्या क्षेत्रात मोठे यश आणि नाव मिळवण्याची क्षमता. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 2, 4, 6, 7,  8 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

वर्षांक 26: वर्षांक 8 चे सर्व गुणदोष + प्रचंड धन संपत्ती मिळण्याची शक्यता, मोठी आपत्ती येण्याची शक्यता. हा वर्षांक त्या व्यक्तीला खूप श्रीमंत बनवू शकतो. हा वर्षांक जन्मांक/भाग्यांक 1, 2, 4, 6, 8 असणाऱ्यांना जास्त फायदेशीर ठरतो.

माझे स्वत:चे निरक्षण असे आहे की वर्षांकाबरोबरच जन्मसालातील रिपीट अंकांचा देखील बराच प्रभाव पडत असतो. उदाहरणार्थ, 1979 ते 1999 या काळातील वर्षांमध्ये 9 आणि/किंवा 8 हे अंक रिपीट झाले आहेत. त्याविषयी मी वेगळा लेख लिहित आहे.

हेही वाचा:
जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?
भाग्यांक म्हणजे काय?
नामांक म्हणजे काय?
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख