-महावीर सांगलीकर
numerologist & Motivator
8149703595
8149703595
अलिकडं समाजात अंकशास्त्रानुसार आपल्या नावाचं स्पेलिंग बदलण्याचं फॅड आलं आहे. स्पेलिंग बदलून नामांक बदलता येतो हे बरोबर आहे, पण त्यानं खरंच कांही फरक पडतो का? आणि असा बदल करणं व्यावहारिक आणि कायदेशीर आहे का? या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.
याबाबतीत तुम्ही सर्वात महत्वाची ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही नावाचं स्पेलिंग बदललं, किंवा आख्खं नाव जरी बदललं तरी तुमच्या मूळ नावाचा, स्पेलिंगचा तुमच्यावर असणारा प्रभाव नष्ट होत नसतो, तो शेवटपर्यंत टिकून रहातो. तुमच्या नवीन नावाचा किंवा स्पेलिंगचा प्रभाव हा अधिकचा (Additional) प्रभाव म्हणता येईल, पण तोही लगेच लागू होत नसतो, त्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात. (ज्यांना लगेच फरक पडला असं वाटतं ते केवळ मानसशास्त्रीय कारणानं असतं, असा फरक जास्त काळ टिकत नाही).
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेलिंगमधील बदलानं नावाचा उच्चार वेगळा होत असेल, अर्थ बदलत असेल तर स्पेलिंगबदलाचा तुम्हाला फायदा होण्याऐवजी तोटाच होईल. समजा तुमचं नाव Kiran आहे. तुम्ही ते बदलून Kirran किंवा Kkirran, Kirron केलं तर मूळ किरण या नावाचा उच्चार बदलेल, अर्थही नाहीसा होईल, त्यामुळं तुम्हाला Kiran या नावाचे मिळणारे फायदे हळूहळू कमी होत जातील. शिवाय याप्रकारे बदललेल्या नावाचा कांही फायदाही होणार नाही. उलट स्पेलिंग बदलण्याच्या नादात तुमचं नाव विकृत होईल आणि त्याचा तुम्हाला मोठा फटका बसू शकेल.
नावात किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करणं हे प्रॅक्टिकलही नाही. म्हणजे तुम्ही कागदोपत्री कुठं-कुठं बदल करणार? आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट, लाईट बिल, मतदार यादी, पासपोर्ट, सातबारा, इंडेक्स वगैरे.... या सगळ्या ठिकाणी बदल करणं तुम्हाला शक्य आहे का? तुमचं बर्थ सर्टिफिकेट, तुमची शैक्षणिक सर्टिफिकिटं या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव किंवा नावाचं स्पेलिंग कसं काय बदलू शकाल? आणि एवढं सगळं केलं तरी तुमच्या मूळ नावापासून, त्याच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकणार आहात काय? महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या नावात एका अक्षराचा जरी फरक केलात तर तुम्हाला अनेक कायदेशीर अडचणी येऊ शकतात.... म्हणजे तुमच्या नावाचं नवं स्पेलिंग कायदेशीर रित्या कुठेच चालू शकत नाही.
तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नावात किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल न करताही, नाव लिहिण्याच्या पद्धतीत बदल करून तुमच्या नामांकात बदल करता येतो. उदा. प्रकाश राजाराम पाटील हे नाव Prakash Rajaram Patil, Prakash Patil, Prakash R. Patil, P.R. Patil असं वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिता येतं आणि प्रत्येक ठिकाणी वेगळा नामांक येतो. त्यातला योग्य नामांक कोणता हे ठरवून तुम्हाला त्या पद्धतीनं नाव लिहिता येईल. (अर्थातच असं करण्यावरही कांही ठिकाणी बंधनं येतात).
नावात किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये नंतर बदल करण्यापेक्षा मुळात नाव ठेवतानाच योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. तरीही तुम्हाला स्पेलिंगमध्ये बदल करायचाच असेल तर वरील सर्व बाबींचा विचार करायला पाहिजे!
हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
No comments:
Post a Comment