Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 24 October 2017

न्यूमरॉलॉजी आणि सायकॉलॉजी

-महावीर सांगलीकर 
Numerologist & Motivator
8149703595, 9145318228

कांही लोक एखाद्या विशिष्ट नंबरकडं आकर्षित होतात. असं आकर्षित होण्यामागं दरवेळी केवळ न्यूमरॉलॉजीकल कारणच असेल असं नाही. कांहीवेळा त्यामागं मानसिक कारणंही प्रबळ असू शकतात. (अर्थात मानिसक कारणांच्यामागं त्या व्यक्तीच्या जन्मांकाचे गुणदोष असू शकतात).

चेन्नईतल्या एका तरुणाच्या मोटर सायकलचा नंबर 420 हा होता. अंकशास्त्राच्या एका अभ्यासकाला ही मोटर सायकल नजरेस पडली तेंव्हा त्यानं त्या तरुणाची सहज चौकशी केली. तोच नंबर का घेतला हे विचारलं. तर त्यानं सांगितलं, मला आवडला म्हणून घेतला! त्या अभ्यासकानं ओळखलं, हा तरुण बहुदा फ्रॉड असावा. पुढे त्याला समजलं की तो तरुण खरंच फ्रॉड होता!

खुनाच्या आरोपाखाली पकडला गेलेल्या हरियाणातल्या एका गुन्हेगाराच्या मोटरसायकलचा नंबर 302 होता!

म्हणजे कांही लोक आपल्या मानसिकतेप्रमाणे नंबर निवडतात. अनेक लोक गाडीसाठी, घरासाठी 1 हा नंबर निवडतात. पण याचा अर्थ त्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 1 असतोच असे नाही, तर ज्यांना आपण टॉप नंबर वर जावे असे वाटते, त्यांच्यात 1 हा नंबर निवडण्याची प्रवृत्ती असू शकते. पण इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की कांही विशिष्ट जन्मांकाच्या व्यक्तींमध्ये ही प्रवृत्ती जास्त प्रमाणात असते.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये इंडिअन पिनल कोडमधल्या फेमस नंबर्सचे आकर्षण असू शकते. शहाण्याने सहज गम्मत म्हणूनही ‘बदनाम’ नंबर्स निवडू नयेत, नाहीतर त्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. अर्थात असे ‘बदनाम’ नंबर्स देश आणि काल यांच्यानुसार वेग वेगळे असू शकतात.

हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख