Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday, 8 November 2017

शांती आणि सहयोग यांचा अंक 24


-महावीर सांगलीकर
8149703595 

खरं म्हणजे कोणताही अंकपूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट नसतो. प्रत्येक अंकाचे कांही गुण आणि कांही दोष असतात. कांही अंकात गुणांचे प्रमाण जास्त असते तर कांही अंकात दोषांचे.

24 या अंकात दोषांचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे या अंकाला चांगला अंक म्हणता येईल.
यातील घटक अंकाची बेरीज 6 येते. (2+4 = 6). त्यामुळे या अंकात सहा या अंकाचे शांती, सहयोग, कुटुंबवत्सलता, जबाबदारी हे गुण असतात. या शिवाय 24 हा अंक व्यवहारकुशलता, मुत्सद्धीपणा, सौंदर्यदृष्टी, चिकित्सक बुद्धी हे गुणही देतो. 24 या अंकात 2 आणि 4 या अंकांचे गुणदोषही असतात. 2, 4, 6 हे अंक परस्परांचे मित्र अंक आहेत हे देखील उल्लेखनीय आहे. 

दिवसाचे 24 तास, 24 तीर्थंकर, अशोक चक्रातील 24 आरे, 24 बुद्ध, 24 अवतार या सगळ्या ठिकाणी 24 या अंकाला महत्व दिलेले दिसते.  

कोणत्याही महिन्याच्या 24 तारखेस जन्मलेली व्यक्ती कुटुंबवत्सल, प्रेमळ, जबाबदार, सर्वांना सांभाळून घेणारी असते. तिचे हे गुण तिच्या चार्ट मध्ये असलेल्या इतर अंकांनुसार कमी-जास्त होऊ शकतात. 


ज्या घरात भांडणे, कलह, अशांतता असते, परस्पर सामंजस्य नसते, तिथे 24 हा अंक घरातील सर्वांना येता जाता दिसत राहील अशा ठिकाणी लावला, तर त्याचा जादूसारखा उपयोग होऊ शकतो. हा अंक हिरव्या किंवा निळ्या रंगात असावा. हा अंक मोबाईल स्क्रीनवर ठेवला तरी त्याचा उपयोग होईल. (पण हा अंक सगळ्यांना सारखाच परिणाम देणार नाही. विशेषकरून जन्मांक किंवा भाग्यांक 2, 3, 4, 6, 8, 9 असणाऱ्या लोकांना याचा चांगलाच फायदा होईल, तर जन्मांक/भाग्यांक 1, 5, 7 असणाऱ्या लोकांना हा अंक त्रासदायक ठरू शकतो).   

हेही वाचा:
जन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24
Numerology: Characteristics of Birth Number 6
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख