Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday, 17 January 2018

अंकशास्त्र: कोअर नंबर्स

 अंकशास्त्र: कोअर नंबर्स
महावीर सांगलीकर 
Numerologist & Motivator
8149703595


आपल्याकडे अंकाशास्त्रानुसार सल्ला देणारे बहुतेक लोक फक्त जन्मांकाचा आणि फार तर नामांकाचा विचार करतात. पण केवळ एवढ्यावरून एखाद्या व्यक्तीचे आकलन होऊ शकत नाही. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीशी वेगवेगळे 20 हून जास्त अंक संबंधीत असतात. त्या सर्वांचा त्या व्यक्तीवर कमी-अधिक प्रमाणात परिणाम होत असतात. त्यापैकी 5 अंक अतिशय महत्वाचे असतात. त्यांना कोअर नंबर्स असे म्हंटले जाते. या लेखात मी या कोअर नंबर्सची माहिती देत आहे, जी अंकशास्त्राचा  अभ्यास करणाऱ्यांना उपयोगी ठरेल. इथे मी प्रकारानुसार या नंबर्सना असलेली इंग्रजी नावेच वापरली आहेत, ज्यामुळे विषय समजायला सोपा होईल. (यातील अनेक नंबर्सना मराठीत पर्यायी नावे नाहीत, कारण आपल्या इथे त्यांचा विचारच केला जात नाही).


लाईफ पाथ नंबर: पूर्ण जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज केल्यावर जो अंक येतो तो म्हणजे लाईफ पाथ नंबर. उदा. 15.03.1989 = 1+5+0+3+1+9+8+9 = 36 = 3+6 = 9. इथे 9 हा लाईफ पाथ नंबर आहे. लाईफ पाथ नंबर व्यक्तीच्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव टाकतो. या नंबरवरून संबंधित व्यक्ती कशा प्रकारचे जीवन व्यतीत करेल हे सांगता येते. 


सोल अर्ज नंबर: आपल्या नावातील प्रत्येक अक्षराचा एक अंक असतो, जो त्या अक्षराच्या इंग्रजी अल्फा बिट्समधील स्थानावरून ठरतो. (A=1, B=2, C=3 यानुसार). सोल अर्ज नंबर हा पूर्ण नावातील स्वरांच्या (A, E, I, O, U) किमतींची बेरीज करून काढला जातो.  हा नंबरही लाईफ पाथ नंबरइतकाच महत्वाचा आहे. याला हार्ट’स डिझायर नंबर असेही म्हंटले जाते. या नंबरमुळे संबंधित व्यक्तीच्या आंतरिक इच्छा-आकांक्षा कळतात. 


एक्स्प्रेशन नंबर:  नावातील सर्व अक्षरांच्या अंकातील किमतींची बेरीज म्हणजे एक्स्प्रेशन नंबर. याला डेस्टिनी नंबर असेही म्हणतात.  या नंबरमुळे संबधित व्यक्तीच्या उपजत गुणांची, कौशल्यांची माहिती मिळते, तसेच सदर व्यक्तीच्या आयुष्याची दिशाही कळते.  


पर्सनॅलिटी नंबर: नावातील व्यंजनांच्या अंकातील किमतींची बेरीज म्हणजे
पर्सनॅलिटी  नंबर. या नंबरवरून लोकांवर तुमचा कशा प्रकारचा प्रभाव पडतो हे सांगता येते. 

बर्थ डे नंबर: तुमच्या जन्म महिन्याच्या ज्या तारखेस झाला त्या तारखेची एक अंकी बेरीज. उदा. तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 25 तारखेस झाला असेल तर 25 = 2+5 = 7 हा तुमचा बर्थ डे नंबर. या नंबरवरून व्यक्तीचा स्वभाव, गुणदोष वगैरे सांगता येते. 


तुमच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये एखादा नंबर एकापेक्षा जास्त ठिकाणी (उदा. तुमचा लाईफ पाथ नंबर 1 आहे आणि इतर चार नंबर्स मध्येही 1 हा अंक एखाद्या ठिकाणी आला आहे) असेल तर तुमच्यात 1 या अंकाचे गुणदोष मोठ्या प्रमाणावर येतील.

वर दिलेल्या कोअर नंबर्सना पूरक ठरणारे अथवा न ठरणारे इतरही अनेक नंबर्स असतात, पण त्यांचे महत्व वरील नंबर्स इतके नसते.

हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

How to Learn Numerology at Your Home?

No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख