Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 30 January 2018

वैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)

-महावीर सांगलीकर 
8149703595 

तुम्ही जेंव्हा Numerology हा शब्द गुगल मध्ये टाकता, तेंव्हा तुम्हाला त्या विषयावरचे हजारो सर्च रिझल्ट्स मिळतात. त्यात तुम्हाला Vedic Numerology ची माहिती असणारी अनेक पाने सापडतील. त्या पानांवर जी माहिती असते त्यामुळे वाचकांचा असा समज होण्याची शक्यता असते की वेदांमध्ये किंवा वैदिक परंपरेत अंकशास्त्र होते. पण प्रत्यक्षात असे कांही नाही.

कोणत्याही वेदामध्ये अथवा वैदिक परंपरेतील कोणत्याही ग्रंथामध्ये अंकशास्त्राचा उल्लेख नाही.
अंकशास्त्राचा सर्वात उपयोग ज्यू लोकांनी केलेला दिसतो. पुढे प्रसिद्ध गणिती व संशोधक पायथागोरस याने अंकशास्त्राला शास्त्रीय बैठक दिली. हा पायथागोरस ग्रीस मध्ये सुमारे 2500 वर्षांपूर्वी होऊन गेला. प्राचीन काळी चीनमध्ये ही अंकशास्त्राचा उपयोग केला जात असे. प्राचीन दक्षिण भारतात द्रविड  लोकांनीही अंकशास्त्र विकसित केले होते. पण त्यांचा वैदिक परंपरेशी कसलाही संबंध नव्हता.

आता आपण थोडा तार्किक पद्धतीने विचार करू. आज जे लोक तथाकथित वैदिक पद्धतीने अंकशास्त्राची प्रॅक्टिस करतात ते आकडेमोडीसाठी इंग्रजी तारखांचा व इंग्रजी अक्षरांचा उपयोग करतात. खरं म्हणजे त्यांनी आकडेमोडीसाठी तिथ्यांचा आणि देवनागरी अथवा इतर भारतीय भाषांतील वर्णमालेचा वापर केला पाहिजे. पण ते तसे करत नाहीत, यातच सर्व कांही आले. (भारतीय ज्योतिषशास्त्रात तिथ्यांचाच वापर केला जातो ही गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे).

तरीही वैदिक अंकशास्त्राचा एक वेगळा अर्थ आपण लावू शकतो. तो म्हणजे ज्या अंकशास्त्रात समस्यांवरील उपाय म्हणून पूजा-अर्चा, कर्मकांड करायला सांगितले जाते, त्याला आपण वैदिक अंकशास्त्र म्हणू शकतो. भारतात अंकशास्त्राची प्रॅक्टिस करणारे बहुतेक लोक मुळात ज्योतिषी असतात, त्यांचे ज्योतिष शास्त्र वैदिक पद्धतीचे असते, ते लोक ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र याची भेसळ करतात, त्यामुळे ते जे उपाय सुचवतात ते वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे असतात. त्यामुळे त्यांच्या अंकशास्त्राला वैदिक अंकशास्त्र म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
अंकशास्त्र: कोअर नंबर्स

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख