-महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
08149703595
अपवाद वगळता जगात बहुतेक ठिकाणी काळा रंग हा अशुभ मानला गेला आहे. अगदी अंधश्रद्धा निर्मुलन वाले, पुरोगामी लोकही निषेधासाठी काळ्या रंगाच्या फिती वापरतात, यातच काय ते आले. अंकशास्त्रातही काळा रंग 8 या अंकाचा अपवाद वगळता इतर कोणत्याही अंकासाठी लकी मानला जात नाही.
अंकशास्त्रानुसार काळा रंग 8 जन्मांक असणाऱ्या (म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेस झाला असेल त्या व्यक्ती) लोकांना लकी ठरतो. त्यामुळे या जन्मांकाच्या व्यक्तींनी काळ्या रंगाचे कपडे, वस्तू वापरल्या तर त्यांना त्या लकी ठरतात. विशेष म्हणजे जन्मांक 8 असणाऱ्या व्यक्तींपैकी बहुतेक व्यक्ती उपजतपणे काळ्या रंगाकडे आकर्षित होत असलेल्या दिसतात.
पण ज्यांच्या जन्मांक 8 नाही अशा व्यक्ती जर काळ्या रंगाकडे आकर्षित होत असतील तर ते त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत: ज्यांचा जन्मांक 8 या अंकाशी विसंगत असेल त्यांच्या बाबतीत काळ्या रंगाचे आकर्षण समस्या निर्माण करू शकते. याची अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत.
माझा एक क्लाएंट होता. तो नेहमीच्या संपर्काताला होता. त्याची जन्मतारीख 30 होती (जन्मांक 3). त्याला नेहमी या ना त्या प्रकारच्या समस्या येत रहात असत. माझ्या लक्षात आलं की त्याच्या समस्यांचं एक मोठं कारण त्याला असलेलं काळ्या रंगाचं आकर्षण हे होतं. काळ्या रंगाची मोटर सायकल, काळा शर्ट, काळा टी. शर्ट, काळे घड्याळ, एवढंच काय टाय देखील काळा. मी त्याला काळ्या रंगाच्या वस्तू वापरू नकोस असा सल्ला दिला होता. पण त्यानं माझा हा सल्ला पाळला नाही. सांगितलेलं कळतंय पण वळत नाही अशी त्याची अवस्था होती. शेवटी मी त्याला सल्ले द्यायचं बंद केलं. पुढं मला कळलं की त्याची एक गर्ल फ्रेंड होती, तिची जन्मतारीख 26 होती, म्हणजे तिचा जन्मांक 8. तिला काळा रंग आवडत असे. ती सांगत असे म्हणूनच हा काळ्या रंगाच्या वस्तू वापरत असे. थोडक्यात म्हणजे तिला काळा रंग आवडतो म्हणून यालाही काळा रंग आवडत असे. जन्मांक 3 आणि जन्मांक 8 हे परस्पर विरोधी स्वभावाचे.
मला यातले धोके जाणवत होते म्हणून मी त्याला पुन्हा एकदा त्याला काळ्या रंगाबाबत सावध केलं. अर्थातच त्यानं माझा सल्ला पुन्हा एकदा टाळला. पुढे त्याच्यावरची संकटे वाढतच गेली, इतकी की त्याची नोकरी गेली आणि त्याच्या कांही उद्योगांमुळे त्याची बदनामीही झाली.
ठेच लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही, सल्लेही ऐकत नाही हेच खरे! त्या क्लाएंटने काळ्या वस्तू वापरायचे पूर्ण बंद केले. त्याने त्याची काळी मोटारसायकल विकून टाकली. त्याने त्याच्या गर्ल फ्रेंड लाही डच्चू दिला. त्यानंतर कांही दिवसात त्याला दुसरीकडे एक चांगली नोकरी मिळाली. आता त्याची गाडी रुळावर आली आहे.
तुम्ही तुमच्या जन्मांकाला सुसंगत असे रंग वापरल्यास त्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल. काळा रंग हा जन्मांक 8 सोडून कोणालाच फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे तुमचा जन्मांक 8 नसेल तर तुम्ही काळ्या रंगापासून सावध राहिले पाहिजे.
हेही वाचा:
- अंक आणि रंग
- तुमचा लकी मोबाईल नंबर
- तुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
No comments:
Post a Comment