Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 14 May 2018

घरातील एखादी व्यक्ती निघून गेली असल्यास काय करावे?

-महावीर सांगलीकर 
Numerologist & Motivator 
8149703595

घरातील एखादी व्यक्ती घर सोडून निघून गेली असल्यास अथवा गायब झाली असल्यास काय करावे? याविषयी नुकतीच एक पोस्ट वाचली. या पोस्टमध्ये एक उपासना सुचवण्यात आली होती व ती 30 केल्यास ती व्यक्ती परत येईल असे सांगण्यात आले होते. घरातून निघून गेलेली व्यक्ती परत येण्यासाठी असले उपाय सुचवणे म्हणजे भंकसपणाचा कळस आहे. असो.

घरातील व्यक्ती निघून गेली असल्यास अथवा गायब झाली असल्यास तुम्ही अशा प्रकारच्या उपासना वगैरे अजिबात करू नयेत, ज्योतिषी, मांत्रिक यांच्या नादी अजिबात लागू नये. त्या ऐवजी सर्वात आधी विचार करावा, कि ती व्यक्ती घरात तिला होणाऱ्या त्रासामुळे निघून गेली आहे काय? मुले, तरुण घरातून निघून जातात यामागची मुख्य कारणे त्यांना पालकांच्याकडून होणारा त्रास, जाच, आई-वडिलांची सततची भांडणे वगैरे घरगुती कारणे असतात. बायको माहेरी निघून जाण्याची कारणे नवऱ्याकडून होणारा त्रास,  नवरा व्यसनी असणे, तो कर्तृत्ववान नसणे, सासूकडून होणारा जाच अशी अनेक कारणे असते. मुलगी घरून पळून जाण्याचे मुख्य कारण तिचे प्रेमप्रकरण हे असते आणि ती तिच्या प्रियकराबरोबर पळून जात असते. बायकोच्या जाचामुळे नवरा घरातून निघून गेल्याची अनेक उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत.

घरी कसलाही त्रास नसताना एखादी व्यक्ती गायब झाली असल्यास त्यामागे अपघात, अपहरण अशी कांही कारणे असण्याची शक्यता असते.

या सगळ्या गोष्टींचा विचार करता निघून गेलेल्या अथवा गायब झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत पुढील पावले उचलायला पाहिजेत:
-ती व्यक्ती का निघून गेली असावी? याचा विचार करावा.
-ती व्यक्ती कोठे जाऊ शकते याचा विचार करावा, त्याप्रमाणे शोध घ्यावा. त्याचवेळी नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कॅम्प्लेंट द्यावी. असे केल्यास त्या व्यक्तीचा ठावठिकाणा लागण्याची जास्तीत जास्त शक्यता असते.

निघून गेलेली व्यक्ती परत आल्यावर ती पुन्हा निघून जाणार नाही यासाठी त्रासदायक व्यक्तींनी आपल्या स्वभावात बदल करणे ही देखील महत्वाची गोष्ट आहे!

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख