Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 1 June 2018

1 जून ज्यांचा वाढदिवस!


महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
8149703595


1 जून हा वाढदिवस असणाऱ्यांची संख्या वर्षातील इतर कोणत्याही तारखेस वाढदिवस असणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते. याचं कारण म्हणजे मुलांना शाळेत घालताना जर मुलाची जन्मतारीख माहीत नसली तर सरसकट 1 जून ही जन्मतारीख नोंदवण्याची पद्धत होती. सध्या हा प्रकार बंद झाला असला तरी या आधीच्या पिढीपर्यंत हा प्रकार मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे 1 जूनला वाढदिवस असणाऱ्यांची संख्या मोठी दिसते. (पण त्यापैकी कांही लोकांची जन्मतारीख खरोखरच 1 जून असू शकते).

तुमची 1 जून ही जन्मतारीख खोटी असली तरी त्या तारखेला तुम्ही जर वाढदिवस साजरा करत असाल तर किंवा ती कागदोपत्री तुम्ही वापरत असाल तर तुमच्यात 1 या अंकाचे गुणदोष दिसून येतील. 1 या अंकाचे मुख्य गुण म्हणजे पुढाकार घेणे, नेतृत्व करणे, व्यवस्थापन आणि नियोजन, धाडस करणे वगैरे. मुख्य दोष म्हणजे बॉसिंग करणे, हुकुमशाही वृत्ती वगैरे.

या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती राजकीय व सामाजिक क्षेत्रात चांगल्या यशस्वी होऊ शकतात. तसेच व्यावसायिक क्षेत्रात, विशेषत: रिअल इस्टेट, शिक्षण क्षेत्र, मॅन्युफॅक्चरिंग यात त्यांना यश मिळू शकते. जबाबदारीच्या आणि वरच्या पदावरील नोकरी त्यांना चांगली ठरते. पोलीस खाते आणि सैन्य येथे देखील वरच्या पदावरील नोकरी त्यांच्या गुणांना वाव देणारी ठरते.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख