Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 7 July 2018

तुमच्या नावाचं महत्व | Your Name is Your First Identity!


-महावीर सांगलीकर 
Numerologist & Motivator


तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि तुम्ही विचारलं की कोण बोलतंय? तर तुम्हाला ती व्यक्ती आपलं नाव सांगण्याऐवजी आपल्या गावाचं नाव सांगते असा अनुभव तुम्हाला अनेकदा येत असेल. म्हणजे तुम्ही विचारलंत ‘कोण बोलतंय’ तर फोन करणारी व्यक्ती म्हणते ‘पुण्याहून बोलतोय’.
असं उत्तर का दिलं जात असावं? त्याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे त्या व्यक्तीची आकलन शक्ती कमी असू शकते किंवा प्रश्नाचं नेमकं उत्तर द्यायचं असतं हेच तिला ठाऊक नसावं.

काही महाभाग असे असतात की त्यांना दोन वेळा ‘कोण बोलतंय’ असं विचारलं तरी ते आपलं नाव सांगत नाहीत. अशा लोकांना बहुधा आपलं नाव उघड करायचं नसतं.

काहींना आपलं नाव सांगायला लाजही वाटत असावी, तर काहींना आपल्या नावाचा न्यूनगंड असू शकतो.
असे हे निनावी, आपलं नाव लपवणारे लोक समाजात स्वत:ची इमेज बनवू शकत नाहीत.

तुम्हाला तुमची इमेज बनवायची असेल तर तुम्ही तुमच्या नावाला महत्व दिलं पाहिजे. कारण नाव हीच तुमची First Identity असते! तुमचं नाव व्हायचं असेल तर जिथं तिथं तुम्ही आपली ओळख आपलं नाव सांगून करून दिली पाहिजे. आणि तुमचं नाव हीच तुमची सर्वात महत्वाची ओळख असते.

तुमचं नाव विचारल्यावर नाव आणि आडनाव सांगितलं पाहिजे. केवळ आडनाव सांगणे हेही चुकीचंच असतं. केवळ आडनाव सांगणाऱ्याच्या सुप्त किंवा उघड मनात आपलं खानदान, जात वगैरेंचा अभिमान असू शकतो. कांही लोकांना आपल्या नावा ऐवजी इनिशिअल्स वापरायची सवय असते. (एन. के. पाटील, एस.जे, कुलकर्णी वगैरे). हे देखील इमेज बिल्डींगला निरुपयोगीच.

नाव लपवणं हा चेहरा लपवण्याचाच एक प्रकार आहे!

हे झालं लॉजिक आणि कॉमन सेन्स. आता आपण अंकशास्त्रीय आणि Law of Attraction च्या दृष्टीकोनातून विचार करू. तुमच्या नावाचं एक विशिष्ट व्हायब्रेशन असतं. तुमच्या कानावर दुसऱ्यांच्या तोंडून तुमचं नाव जेवढ्या वेळा पडेल तेवढा तुमचा फायदाच होईल. पण यापेक्षा जास्त फायदा तुम्ही स्वत: तुमचं नाव किती वेळा उच्चारता, लिहिता त्यानुसार होईल. महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वत:वर प्रेम करायला शिकाल. तुमचा स्वाभिमान वाढीस लागेल. आणि समाजात तुम्ही तुमची एक स्वतंत्र इमेज बनवू शकाल.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख