-महावीर सांगलीकर
8149703595
* कांही लोक त्यांचं तुमच्याकडं कांही काम असलं तरच तुमच्याशी संपर्क साधतात. त्यांचं काम झालं की ते तुम्हाला विसरून जातात. परत कधी भेटलेच तर तुमच्याशी तुटकपणे वागतात. त्यांची ही कृतघ्नता तुमच्या मनाला मोठी वेदना देऊन जाते.
* आपुलकी ही दोन्हीकडून असावी लागते, आणि ती नुसती असून उपयोगी नसते तर व्यक्तही करायची असते. ती व्यक्त करण्यात तुम्ही कमी पडलात तर तुमच्याबद्दल संबंधित व्यक्तीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.
* कांही बहाद्दर असेही असतात की तुम्ही आपणहून त्यांच्याकडे गेलात तर ते तुमचं स्वागत करतील, पाहुणचार करतील, पण स्वतः हुन तुम्हाला कधी बोलावणार नाहीत आणि कधी तुम्हाला फोन ही करणार नाहीत.
* कांही बहाद्दर असेही असतात की तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर ते पाहुणचार तर सोडा, साधे पाणी देखील विचारणार नाहीत!
* सोशल मीडियात तुमच्या पोस्ट लाईक करायच्या, पण प्रत्यक्षात समोर आलं की ओळख देखील द्यायची नाही किंवा तोंड दुसरीकडं फिरवायचं हा एक मोठा बिहॅविअर प्रॉब्लेम आहे.
* दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आपुलकी आहे पण त्या व्यक्तीला तुमच्याशी कांही देणं घेणं नाही असं तुमच्या लक्षात आलं की नाईलाजाने का होईना, तुम्हाला त्या व्यक्तीच्या बाबतीत कांही कठोर निर्णय घ्यावे लागतात. तुम्हाला एखादं नातं टिकवावं असं वाटतंय, पण समोरच्याला ते नकोच असेल तर तुम्ही काय करू शकता? एकतर्फी नातेसंबंध फार काळ टिकू शकत नाही!
हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!