Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 25 September 2015

तुमच्या बिझनेसचं नाव

-महावीर सांगलीकर
Mobile Phone 8149703595 


तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करताय. सगळी तयारी झालीय. आता तुमच्या दुकानाला, फर्मला किंवा कंपनीला नाव काय द्यायचं असा प्रश्न आहे. हे नाव देताना तुम्ही पुढील गोष्टींचा विचार केला पाहिजे:

1. हे नाव शक्यतो तुमच्या व्यवसायाला अनुरूप असायला पाहिजे. म्हणजे त्या नावामुळे तुम्ही नेमका काय व्यवसाय करता हे स्पष्ट व्हायला पाहिजे. असे नाव तुमच्या नवीन व्यवसायाला कमी काळात बरकत आणते. कांही लोक ABC ENTERPRISES या प्रकारची निरर्थक नावं देतात, त्याचा कांही उपयोग होत नाही.

2. वरील गोष्ट तुम्ही व्यवसायात एकदमच नवीन असाल तर महत्वाची ठरते. पण तुमचा आधीच एखादा व्यवसाय आहे आणि त्याचे नाव प्रसिद्ध झालेले आहे, त्यावेळी तुम्ही  ते जुनंच नाव नवीन व्यवसायासाठी देखील वापरू शकता. याचा फायदा असा की त्या जुन्या नावाच्या गुडविलचा तुमच्या नवीन व्यवसायाला फायदा होतो.

3. तुमच्या व्यवसायाला धार्मिक, पारंपारिक नाव  देऊ नये, कारण असे नाव दिल्यास तुमच्या व्यवसायाभोवती एक अदृश्य भिंत तयार होते, जी तुमच्या परंपरेच्या बाहेरील अनेक लोकांना तुमच्याकडं येण्यापासून थांबवते. (तुमचा व्यवसायच मुळी धार्मिक प्रकारचा असेल तर वेगळी गोष्ट आहे). पण या नियमाला अनेक अपवाद देखील आहेत.

4. तुम्ही जे कांही नाव निवडाल ते अंकशास्त्रानुसार योग्य पाहिजे. त्या नावाचा नामांक (Name Number) तुमचा जन्मांक (Birth Number) आणि भाग्यांक (Life Path Number) यांना अनुकूल असायला पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. अंकशास्त्रीय दृष्ट्या योग्य नाव निवडल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रचंड फायदा होय शकतो. या विषयावरील माझा 'बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!' हा लेख जरूर वाचावा.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख