Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 19 April 2016

भगवान महावीर

महावीर सांगलीकर 
9145318228


भगवान महावीर हे प्राचिन भारतातील एक महान तत्वज्ञ आणि धर्मसुधारक होते. त्यांचा जन्म बिहारमधील वैशाली येथे ई.स. पूर्व 599 साली झाला होता. त्यांची जन्मतिथी चैत्र शुद्ध त्रयोदशी होती. (त्रयोदशी म्हणजे 13). अंकशास्त्रात प्राचिन काळात होऊन गेलेल्या व्यक्तींचा बाबतीत त्यांच्या जन्मतिथिचा विचार केला जातो, तर उत्तर मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील व्यक्तिंच्या बाबतीत त्यांच्या इंग्रजी जन्म तारखेचा विचार केला जातो. त्यानुसार इथे मी भगवान महावीरांच्या 13 या जन्मतिथिनुसार त्यांचे अंकशास्त्रीय विश्लेषण करत आहे.

जन्मतिथी 13
जन्मांक 4 (13=1+3=4)

जन्मांक 4 ची वैशिष्ठ्ये 
जन्मांक 4 असणाऱ्या व्यक्तिंची मुख्य विशेषता म्हणजे या व्यक्ति इतरांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात, आणि त्या मांडत असलेले विचार इतरांच्यापेक्षा खूपच वेगळे असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या नाण्याच्या छाप्याबद्दल बोलत असाल तर  या व्यक्ति काट्याबद्दल बोलतील, आणि नाण्याला केवळ दोनच बाजू नसून तीन किंवा अधिक बाजू असू शकतात हेही दाखवून देतील.  हे लोक वरवर विचार करण्या ऐवजी खोलवर विचार करत असल्याने इतरांना असे वाटते की ते मुद्दाम आपले म्हणणे खोडून काढत आहेत.
यांच्या हाती नेतृत्व आले तर या व्यक्ति पारंपारिक सिस्टिमला बदलून टाकतात. परंपरा तोडणे हे त्यांचे मुख्य लक्षण असते. तरीदेखील परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ यांच्या विचारात, जीवनात, कामात दिसून येतो.

धन, संपत्ती, पैसा ही गोष्ट त्यांच्यासाठी दुय्यम असते. या व्यक्ति जास्त करून समाज सुधारक असतात.
भगवान महावीरांच्या बाबतीत वरील सर्व गोष्टी लागू होतात.

जन्मतिथी 13 
13 हा अंक रहस्यमय आणि गूढ आहे.  हा अंक Occult Sciences शी संबधित आहे. एकीकडे हा अध्यात्माशी संबधीत आहे तर दुसरीकडे हा ज्यांचा जन्मांक आहे त्या व्यक्तिंच्याकडे अनेक प्रकारच्या गूढ विद्या/शक्ती असतात. यात पुढे होणा-या घटनांची आगाऊ सूचना मिळणे, मनाने दूर अंतरावर संदेश पाठवणे किंवा मिळवणे, दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे ते ओळखणे, एखादी व्यक्तिचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ काय आहे हे आपल्या विलक्षण तर्कबुद्धीने आणि Intuition Power ने ओळखणे अशा अनेक गोष्टी येतात. भगवान महावीरांच्या बाबतीत अशा गोष्टी नेहमीच दिसून आल्या आहेत.

वरील विश्लेषणावरून भगवान महावीरांच्या बाबतीत 4 आणि 13 या दोन्ही अंकाची वैशिष्ठ्ये लागू झालेली दिसतात.

हेही वाचा:
स्वप्ने आणि त्यांचे गूढ अर्थ
अंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन ग्रंथ
अनिसचे विद्वान(?) लेखक आणि अंकशास्त्र
विज्ञान म्हणजे काय? गूढ विद्या आणि विज्ञान
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख