Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 22 May 2016

आयुष्याचा परफेक्ट जोडीदार


-महावीर सांगलीकर 
8149703595
सुखी जोडपी पाहिली तर लक्षात येते की त्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक एकसारखाच किंवा अनुरूप असतो. जन्मांक आणि भाग्यांक दोन्हीही सारखे किंवा अनुरूप असतील तर ते परफेक्ट जोडीदार असतात. याउलट ज्या जोडप्यात तणाव आणि भांडणे आहेत त्यांचे जन्मांक/ भाग्यांक अनुरूप नसणारे असतात. त्यामुळे आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे.

जोडीदाराची निवड करताना समान जन्मांक आणि समान भाग्यांक असणाऱ्या व्यक्तिला सर्वोच्च प्राथमिकता द्यावी. म्हणजे समजा तुमचा जन्मांक 5 आहे आणि भाग्यांक 6 आहे, तर तुमच्या जोडीदाराचा जन्मांक ही 5 असावा आणि भाग्यांक 6 असावा. पण अशी जोडी जुळणे तसे कठीणच. त्यामुळे तुम्ही त्याच अंका ऐवजी मित्र अंकाचा विचार करावा. जसे, 5 या अंकाचे मित्र अंक  1 आणि 7 आहेत, तर 6 या अंकाचे मित्र नंबर्स 3 आणि 9 आहेत. आता परफेक्ट जोडीदार शोधण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

तुमचा जन्मांक 5 भाग्यांक 6
अनुरूप जोडीदार :
जन्मांक 1, 5 किंवा 7
भाग्यांक 3, 6 किंवा 9

कोणते अंक कोणत्या अंकाचे मित्र अंक आहेत हे लक्षात ठेवणे सोपे आहे.
1, 5, 7 हे एकमेकांचे मित्र अंक आहेत.
2, 4, 8 हे एकमेकांचे मित्र अंक आहेत.
3, 6, 9 हे एकमेकांचे मित्र अंक आहेत.

त्याचप्रमाणे एकमेकांना अनुरूप नसणाऱ्या अंकांचाही विचार करावा. जर संभाव्य जोडीदाराचे अंक अनुरूप नसतील तर अशा व्यक्तिशी लग्न करणे टाळावे.

अनुरूप नसणारे अंक (शत्रू अंक):
1 आणि 2, 4, 6
2 आणि 1, 5, 7
3 आणि 4, 7, 8
4 आणि 1, 3, 5, 9
5 आणि 2, 4, 6
6 आणि 1, 5, 7
7 आणि 2, 3, 6, 8
8 आणि 3, 7, 9
9 आणि 4, 8

जन्मांक आणि भाग्यांक कसा काढावा याची माहिती पुढील ठिकाणी वाचावी:
जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?
भाग्यांक म्हणजे काय? 

या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या परफेक्ट जोडीदाराची निवड करू शकता. तुमचा जन्मांक आणि भाग्यांक काय आहे ते पहा आणि त्याप्रमाणे तुमच्या परफेक्ट जोडीदाराची निवड करा.हेही वाचा:
प्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी 
26चा आकडा आणि वैवाहिक जीवन
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख