-महावीर सांगलीकर
8149703595
8149703595
अनेकांचा अंकशास्त्रावर अजिबात विश्वास नाही असे दिसते. त्यामागे अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र आहे असा त्यांचा समज असणे हे एक मोठे कारण आहे., अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र हे खोटे असते असा असणारा समज आणि म्हणून अंकशास्त्र हे देखील खोटे असते अशी त्यांची बालबोध समजूत असावी. असो.
ज्यांना अंकशास्त्राचा खरेखोटेपणा स्वत:च तपासून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी इथे मी कांही प्रयोग देत आहे.
प्रयोग पहिला: तुमच्या खास मित्रांची एक यादी बनवा. प्रत्येकाच्या नावापुढे त्याची जन्मतारीख लिहा. मग या जन्मतारखांचा थोडा अभ्यास करा. आपल्याला असे दिसून येईल की या जन्मतारखांमध्ये विशिष्ट तारखा असलेल्यांचे प्रमाण खूपच जास्त आहे, आणि या तारखा तुमच्या जन्मांकांशी संबंधीत आहेत. म्हणजे समजा तुमची जन्मतारीख 16 आहे, तर तुमचा जन्मांक 7 येतो, आणि तुमचे खास मित्र हे जास्त करून 7, 16 अथवा 25 तारखेस जन्मलेले असतील (कारण या सर्वांचा जन्मांक 7 आहे), किंवा मग ते जन्मांक 1 किंवा 5 असणारे म्हणजे 1, 5, 10, 14, 19, 23, 28 या तारखांना जन्मलेले असतील. (जन्माक 1, 5 आणि 7 हे अंकशास्त्रात मित्र नंबर आहेत).
वरील तारखांची एकून संख्या ही 10 आहे. शक्यतेच्या नियमाप्रमाणे तुमच्या खास मित्रांच्या संख्येत या तारखांना जन्मलेल्या मित्रांची संख्या 10/31 म्हणजे सुमारे 33 टक्के पाहिजे. पण प्रत्यक्षात त्यांची संख्या खूपच जास्त दिसते. याचे कारण म्हणजे आपण जरी जन्मतारखा बघून मैत्री करत नसलो तरी आपले मित्र हे जास्त करून आपल्या जन्मांकाशी संबंधीत तारखांना जन्म झालेलेच असतात. हे कसे घडते हा संशोधनाचा विषय आहे.
प्रयोग दुसरा: तुमच्या आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या घटनांची एक यादी बनवा. जसे, तुम्हाला पहिली नोकरी लागली ती तारीख, तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला ती तारीख, तुम्ही गाडी घेतली ती तारीख, तुमच्या लग्नाची तारीख, तुम्हाला पहिले मूल झाले ती तारीख, तुम्ही नवीन घर घेतले, तिथे रहायला गेलात त्या तारखा, तुमच्या पहिल्या परदेश प्रवासाची तारीख वगैरे. या तारखा तपासून पाहिल्या तर तुम्हाला असे दिसून येईल की वरील प्रकारच्या घटनांपैकी बहुतेक घटना या ठराविक तारखांनाच घडलेल्या आहेत, आणि त्या तारखा तुमच्या जन्मांकाशी संबधीत आहेत.
प्रयोग तिसरा: तुमच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला जे नंबर आले त्यांचीही एक यादी बनवा. तुम्ही लहानपणी ज्या घरात रहात होता त्या घराचा नंबर, मोठेपणी तुम्ही ज्या घरात रहायला गेलात त्या घराचा नंबर, तुमच्या गाडीचा नंबर, तुमच्या पासपोर्टचा नंबर, ब्यांकेचा खाते नंबर, वगैरे. असे जेवढेही नंबर असतील, त्यात पुन्हा तुम्हाला असे दिसून येईल की वर दिलेले विशिष्ट अंक येथेही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.
प्रयोग चौथा: तुम्हाला आवडणारे हिरो, हिरोइनी, राजकीय नेते, महापुरुष, आदर्श व्यक्ति यांची एक यादी बनवा. त्यांच्या नावापुढे त्यांच्या जन्मतारखा लिहा. इथंही तुम्हाला असं दिसेल की या यादीत तुमचाच जन्मांक असणारे लोक जास्त प्रमाणात आहेत.
यावरून तुम्हाला असे दिसून येईल की आपल्या आयुष्यात कांही विशिष्ट नंबर हे मोठ्या प्रमाणावर रिपीट होत असतात. अशा या रिपिटेशनचा अभ्यास, निरीक्षणे आणि त्यानुसार संबंधित व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करणे म्हणजेच अंकशास्त्र होय.
हेही वाचा:
No comments:
Post a Comment