Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 6 February 2015

विज्ञान म्हणजे काय? गूढ विद्या आणि विज्ञान

 -महावीर सांगलीकर
Mobile Phone 9145318228

अमुक गोष्ट सायन्स आहे का किंवा सायंटीफिक आहे का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. गूढ गोष्टींचे अनेक अभ्यासक या प्रश्नाला उत्तर म्हणून आपला विषय सायन्स कसा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात.

पण खरं म्हणजे सायन्स किंवा विज्ञान म्हणजे काय हेच अनेकांना माहीत नसते. सायन्सची ऑक्सफोर्ड डिक्शनरीतली व्याख्या अशी आहे:

The intellectual and practical activity encompassing the systematic study of the structure and behavior of the physical and natural world through observation and experiment.

वरील व्याख्येवरून कोणत्याही विषयाचा पद्धतशीर अभ्यास केला तर ते सायन्स ठरते. विज्ञान या शब्दाचा भारतीय परंपरेतील अर्थही साधारण तसाच आहे.  तिथं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असा अर्थ दिला गेला आहे.

अनेकांना असं वाटतं की विज्ञान म्हणजे केवळ फिजिक्स. ते फिजिक्सचे नियम गूढ विद्यांना लावायला जातात. प्रत्यक्षात फिजिक्सचे नियम अगदी सायकॉलॉजी, बायॉलॉजी अशा विषयांना देखील लागू होत नाहीत. सोशल सायन्सेस फिजिक्सच्या नियमात कशी बसतील? तेंव्हा फिजिक्सच्या नियमात बसणारं तेच विज्ञान असं मानणं म्हणजे एक अंधश्रद्धा आहे.

माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही. पण या शास्त्राचे विरोधक ज्योतिषांकडून ज्या अपेक्षा करतात, त्यांना चॅलेंज देतात तेंव्हा मला गम्मत वाटते. जसे, की आम्ही दहा कुंडल्या देऊ, ज्योतिषांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे 50 टक्के जरी बरोबर दिली, अगदी त्यातील पाच कुंडल्यांच्या बाबतीत तरी, तर आम्ही एवढे बक्षीस ठेवता येईल. मग असेच चॅलेंज हवामान शास्त्राला देखील देता येईल. म्हणजे आम्ही दहा ठिकाणे सांगू, पावसाळ्यातील एखादी तारीख देऊ, तुम्ही आम्हाला त्या त्या गावी त्या तारखेला उन पडेल की  पाऊस, वीजा कडकडतील की नाही, वातावरण थंड राहील का गरम, अशा पाच प्रश्नांची उत्तरे द्यावीत. त्यातील 50 टक्के उत्तरे  बरोबर आली तर हवामान शास्त्र हे विज्ञान आहे ही गोष्ट आम्ही मानू.   असो.

एखादी गूढ विद्या विज्ञान आहे की नाही ही गौण गोष्ट आहे. त्या विद्येचा जर मानवी कल्याणासाठी, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी उपयोग होत असेल, तर ती विद्या विज्ञान आहे का नाही यावर चर्चा, वाद  करणे हा वेडगळपणा आहे. गूढ विद्यांचा जर कोणी दुरुपयोग करत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे, पण त्यावरून ती विद्या म्हणजे अंधश्रद्धा आहे असे कसे काय म्हणता  येईल? मग तोच नियम अॅलोपथीला लावता येईल.  म्हणजे, अनेक अॅलोपथीक डॉक्टर्स रोग्यांना लुटत आहेस, अनेक हॉस्पिटल्स म्हणजे लुटण्याचे अड्डे झाले आहेत, म्हणजे मग अॅलोपथी ही अंधश्रद्धा ठरवायची काय?

विज्ञान असण्याचा सर्वाधिक मान ज्या फिजिक्सला मिळतो, तिथंही अनेक गोष्टी या गृहीत धरलेल्या आहेत, अजून सिद्ध झालेल्या नाहीत. अनेक गोष्टींच्या बाबत परस्परविरोधी वेगवेगळ्या थेअऱ्या मांडल्या जातात, आणि खुद्द संशोधकांमध्ये थेअरी प्रमाणे गट आहेत. (जसे, विश्वाच्या उत्पत्तीची बिग बॅन्ग थेअरी आणि स्टेडी स्टेट थेअरी).

गूढ विद्यांच्या अभ्यासकांनी आपली विद्या सायन्स आहे हे सिद्ध करण्याच्या भानगडीत पडू नये. त्याची गरज नाही. आपला अभ्यास आणि संशोधन करत राहावे, त्यांचा लोकांना फायदा करून द्यावा. रिझल्ट्सना महत्व द्यावे. विरोधकांकडे दुर्लक्ष करावे.

हेही वाचा: 
अंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा
अंकशास्त्र: नरेंद्र दाभोलकर आणि अब्राहम कोवूर 
अंकशास्त्र म्हणजे काय?
अनिसचे विद्वान(?) लेखक आणि अंकशास्त्र

2 comments:

Email Newsletter

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख