-महावीर सांगलीकर
8149703595
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची जन्मतारीख आणि नाव हे दोन्हीही अंकशास्त्राच्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. त्यांची जन्मतारीख 7 ऑक्टोबर 1952 ही आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 7 येतो तसेच भाग्यांकही 7 येतो. त्यांच्या VLADIMIR या नावाची अंकातली किंमतही 7 येते, तर त्यांच्या PUTIN या आडनावाचे पहिले अक्षर P याचीही किंमत 7 आहे!
7.10.1952= (7)+ (1+0)+(1+9+5+2)=7+1+17=25=2+5=7
VLADIMIR
43149499 बेरीज 43=4+3=7
PUTIN
73295 बेरीज 26 =2+6=8
या प्रकारे पुतिन यांच्या चार्टमध्ये 7 हा अंक चार वेळा आलेला आहे. (जन्मांक, भाग्यांक, नामांक (First Name) आणि आडनावाचे पहिले अक्षर).
7 हा अंक उद्योग, व्यवसाय, धर्म आणि आध्यात्मिकता यांच्याशी संबधित आहे. याशिवाय या अंकाचे आणखीन एक मोठे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या अंकाशी संबधीत लोक अतिशय गुप्तता बाळगणारे (Secretive Nature) असतात. त्यामुळे ते सिक्रेट सर्व्हिसमध्ये काम करण्यासाठी अतिशय योग्य असतात. पुतिन हे रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संघटनेत लेफ्टनंट कर्नल होते. ते या संघटनेत 16 वर्षे होते. (16=1+6=7). पुन्हा 7!
1996 मध्ये त्यांनी त्यावेळचे अध्यक्ष बोरीस येल्त्सिन यांच्या ऑफिसमध्ये रूजू झाले आणि तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. 1996= 1+9+9+6=25=2+5=7.
25 जुलै 1998 रोजी येल्त्सिन यांनी पुतिन यांना एफएसबी या वेगळ्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखपदी निवड केली. 25=2+5=7, जुलै=7.
16 ऑगस्ट 1999 रोजी पुतिन यांची रशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. 16=1_6=7
7 मे 2007 ला ते रशियाचे अध्यक्ष झाले आणि पुन्हा 7 मे 2012ला दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले.
विशेष म्हणजे त्यांनी शाळेत जायला सुरवात केली ते साल होते 1960. याची एक अंकी बेरीज 7 येते.
वर म्हंटल्याप्रमाणे 7 हा अंक धर्म आणि आध्यात्मिकतेशी संबधीत आहे. पुतिन हे ऑर्थोडक्स ख्रिश्चन आहेत आणि नियमितपणे चर्चला जातात. (रशिया कम्युनिस्ट देश होता त्यावेळीही तिथले लोक धर्मपालन करत असत. आता तर तिथं धर्माला अधिकृत मान्यता आहे.).
PUTIN=26
पुतिन या नावाची अंकातली किंमत 26 आहे. ज्यांच्या चार्टमध्ये हा नंबर दिसतो त्यांच्या वैवाहिक जीवनात कांही ना कांही मोठी बाधा येत असते. पुतिन यांचा ते अध्यक्षपदी असतानाच घटस्फोट झाला आहे.
26 हा अंक अतिशय शक्तिशाली असून तो आपत्तीचा नंबर म्हणून ओळखला जातो. पुतिन हे अतिशय आक्रमक आहेत आणि अमेरिकेच्या जागतिक पोलीसगीरीला आळा घालण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. नजीकच्या काळात यातून तिसऱ्या महायुद्धाची आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्याची लक्षणे आत्ताच दिसू लागली आहेत.
हेही वाचा:
एडॉल्फ हिटलर
इंदिरा गांधी
मार्क झुकेरबर्ग
नरेंद्र मोदी
बिल, हिलरी आणि मोनिका
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
No comments:
Post a Comment