Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 27 March 2017

वाचासिद्धी सहजपणे मिळवा!


–महावीर सांगलीकर 8149703595 

वाचासिद्धी म्हणजे तुम्ही जे बोलाल तसं घडणं, तुम्ही बोलाल ते खरं ठरणं. ही वाचा सिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही ऋषि-मुनी असण्याची, तंत्रसाधक असण्याची गरज नाही. तुम्ही तप करायचीही गरज नाही. तुम्हाला वाचासिद्धीचे  मंत्र माहीत असण्याचीही गरज नाही. कोणा गुरूकडं ज्ञान मिळवण्यासाठी तुमच्या आयुष्यातली अनेक वर्षे घालवायची गरज नाही. तुम्ही जे बोलाल ते सहज खरं ठरण्यासाठी तुम्हाला कांही पथ्यं पाळावी लागतील. ती म्हणजे तुम्ही कमी बोलायला पाहिजे आणि नेमकं बोलायला पाहिजे. तुमच्या तोंडून फालतू शब्द, वाक्यं निघता कामा नये. तुमच्या तोंडून निघालेलं वचन (promise) कोणत्याही परिस्थितीत तुम्ही पाळलंच पाहिजे. दिलेली वेळ, दिलेला शब्द तुम्ही पाळलाच पाहिजे. तुम्हाला अंतर्मुख होता आलं पाहिजे, चिंतन करता आलं पाहिजे आणि मौन पाळता यायला पाहिजे. हे सगळं तुम्हाला जमलं तर तुम्ही वाचा सिद्धी मिळवण्याची पहिली परीक्षा पास झालात असं समजावं. मग तुम्ही वाचा सिद्धी तर सहजपणे मिळवू शकालच, शिवाय तुम्हाला तुमच्या जीवनात जे कांही पाहिजे तेदेखील सहजपणे मिळेल. वर सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला खरंच जमत असतील तर तुम्ही पुढील ज्ञान मिळवण्यासाठी मला भेटायला हरकत नाही.

हेही वाचा:

अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

नम्र विद्वत्तेला सलाम!

  

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख