Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 21 February 2015

प्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी?

-महावीर सांगलीकर
8149703595


आजकाल अनेक तरुण-तरुणींच्या ओळखी आधी फेसबुक किंवा whats app वर होतात, त्यांचे सूर जुळतात आणि मग ते प्रत्यक्ष भेटायचं ठरवतात. हा लेख खास अशा तरुण-तरुणींसाठी लिहिला आहे.

तुमच्या भावी जीवनसाथीला, प्रेमिकेला अथवा प्रियकराला पहिल्यांदाच भेटायला योग्य तारीख कोणती? अंकशास्त्रात याचे अचूक उत्तर सापडते.

जर तुम्हाला त्या व्यक्तिची जन्मतारीख माहीत असेल तर योग्य तारीख निवडणे तसे खूपच सोपे आहे. त्या व्यक्तिचा जन्मांक आणि तुमचा जन्मांक यावरून तुम्हाला भेटीसाठी योग्य तारीख निवडता येते. जसे, समजा, तुमची जन्मतारीख 10 आहे, आणि त्या व्यक्तिची जन्मतारीख 16 आहे, तेंव्हा तुमचा जन्मांक 1 आणि त्या व्यक्तिचा जन्मांक 7 आहे. अशावेळी महिन्याची अशी कोणतीही तारीख, जी जन्मांक 1 आणि 7 या दोन्हीला  अनुकूल आहे, त्या तारखेला तुम्ही  पहिली भेट घेऊ शकता. कित्येकांच्या बाबतीत हे आपोआपच घडते. योग्य तारखेला हे असे आपोआप घडणे फारच चांगले असते. पण ते जर चुकीच्या तारखेला घडले तर त्याचे वाईट परिणाम होवू शकतात.

(जन्मांक कसा काढावा याची माहिती  जन्मांक म्हणजे काय? येथे वाचावी)

तसेच आपण ही गोष्टही लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या जोडीदाराचा जन्मांक तुमच्या जन्माकांशी सुसंगत पाहिजे.

पुढे प्रत्येक जन्मांकाला अनुकूल जन्मांक आणि पहिल्या भेटीसाठी अनुकूल तारखा दिल्या आहेत:

जन्मांक 1: अनुकूल जन्मांक: 1, 5, 7 अनुकूल तारखा: 1, 5, 7, 10, 14, 16, 19, 23, 25
जन्मांक 2: अनुकूल जन्मांक: 2, 4, 8 अनुकूल तारखा: 2, 4, 8, 11, 13, 17, 20, 22
जन्मांक 3: अनुकूल जन्मांक: 3, 6, 9 अनुकूल तारखा: 3, 6, 9, 12, 15, 21, 24
जन्मांक 4: अनुकूल जन्मांक: 2, 4, 8 अनुकूल तारखा: 2, 4, 8, 11, 13, 17, 20, 22
जन्मांक 5: अनुकूल जन्मांक: 1, 5, 7  अनुकूल तारखा: 1, 5, 7, 10, 14, 16, 19, 23, 25
जन्मांक 6: अनुकूल जन्मांक: 3, 6, 9 अनुकूल तारखा: 3, 6, 9, 12, 15, 21, 24
जन्मांक 7: अनुकूल जन्मांक: 1, 5, 7  अनुकूल तारखा: 1, 5, 7, 10, 14, 16, 19, 23, 25
जन्मांक 8: अनुकूल जन्मांक: 2, 4, 8  अनुकूल तारखा: 2, 4, 8, 11, 13, 20, 22
जन्मांक 9: अनुकूल जन्मांक: 3, 6, 9 अनुकूल तारखा: 3, 6, 9, 12, 15, 21, 24

सूचना:
# भेटीच्या संपूर्ण तारखेची (तारीख/महिना/साल) एक अंकी बेरीज आपल्या जन्मांकाला प्रतिकूल नसावी.
# जन्मांक 8 असणाऱ्या व्यक्तिंनी 17, 26 या तारखा त्यांच्या जन्मांकानुसार असल्या तरी त्या टाळाव्यात. 26 तारीख सगळ्यांनीच टाळावी.

हेही वाचा:
जन्मांक म्हणजे काय?
बिझनेस न्यूम रॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा
अंक आणि करीअर 
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख