Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 7 February 2015

अंकशास्त्राचे आश्चर्यकारक उदाहरण

-महावीर सांगलीकर
914531228

अंकशास्त्रामध्ये 22 हा नंबर ‘मास्टर बिल्डर’ म्हणून ओळखला जातो. ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 22 आहे त्यांच्याकडे कांहीतरी अविश्वसनीय, भव्य-दिव्य करून दाखवण्याची ताकत असते. पण बहुतेक वेळा हा नंबर मिळालेले लोक त्या शक्तिचा उपयोग करून घेत नाहीत. जे लोक असा उपयोग करून घेतात, त्यांच्याकडून आश्चर्यकारक काम घडते.

इथे मी कांही उदाहरणे देत आहे. मेवाडचे महाराजा उदयसिंग (दुसरे), त्यांचा मुलगा महाराणा प्रताप सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज  यांच्याविषयी, त्यांच्या लढाऊ जीवनाविषयी  बहुतेकांना माहीत असतेच. त्यांच्या जन्मतारखा आणि संपूर्ण जन्मतारखेची बेरीज पहा:

महाराजा उदयसिंग (दुसरे)
जन्मतारीख:  4.8.1522
पूर्ण बेरीज: 4+8+1+5+2+2=22

महाराणा प्रताप:
जन्मतारीख: 9.3.1540
पूर्ण बेरीज : 9+3+1+5+4+0=22

छत्रपती शिवाजी महाराज
जन्मतारीख: 19.2.1630
पूर्ण बेरीज: 1+9+2+1+6+3+0=22कांही लोक याला केवळ योगायोग मानतील. पण अंकशास्त्रात अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्याच्यामुळे या गोष्टी केवळ योगायोग नसून नंबर्सचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो हे दाखवून देतात.

वर दिलेल्या उदाहरणातील तीनही व्यक्तिंचा भाग्यांक 22 हा आहे. त्याचप्रमाणे ज्यांचा जन्मांक 22 आहे, अशा अनेक लोकांनी असेच कांही भव्यदिव्य करून दाखवले आहे. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे त्याचे एक उदाहरण. अमेरिकेच्या सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची जन्म तारीख 22 होती.

22 जन्मतारीख असणारे लोक  कांहीतरी भव्य-दिव्य करून दाखवतात याची आणखी कांही उदाहरणे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि राजाराम मोहन रॉय.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील घटना आणि त्यांच्याशी अंकांचा असलेला संबंध याविषयीचा माझा लेख येथे वाचा: छत्रपती शिवाजी महाराज अंकशास्त्राच्या नजरेतून

हेही वाचा:
 शक्तिशाली मास्टर नंबर्स 
जन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख